आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरमध्‍ये विवाहितेचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्लेगाव - गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील २२ वर्षीय विवाहितेची पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सासरची मंडळी छळ करत असल्याने दोन महिन्यांपासून विवाहिता माहेरी होती. दोन दिवसांपूर्वीच मध्यस्थांनी व नातेवाइकांनी समजूत घालून तिला सासरी आणून सोडले होते; परंतु याचा राग मनात धरत पतीने कुऱ्हाडीचे घाव घालत तिचा खून केला. आरोपी पती, सासू फरार असून सास ऱ्यांना रात्री अटक केली.

चित्तेगाव येथील रहिवासी राजाराम गायकवाड यांची मुलगी जयश्री हिचा विवाह शिल्लेगाव येथील कृष्णा प्रभाकर राऊत याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता.
पुढे वाचा.. लग्नानंतर एक ते दीड वर्ष जयश्री व कृष्णा यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू होता;
बातम्या आणखी आहेत...