आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना मानवंदना, आयुक्तालयात कार्यक्रमाचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिसहुतात्मा दिनानिमित्त बुधवारी सकाळी आठ वाजता शहीद पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली. या वेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी २०१४ ते २०१५ या काळात कर्तव्यावर शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या नामावलीचे वाचन करण्यात आले.
आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, भगवान घडामोडे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त संदीप आटोळे, वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, बाबाराव मुसळे, रमेश गायकवाड तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांनी पुष्पचक्र अर्पण केले. उद्योजक विवेक देशपांडे, दिलीप थोरात, हर्सूल कारागृह अधीक्षक विनोद शेकदार, रामराव हाके, जेम्स अंबिलढगे, पृथ्वीराज पवार, रेखा जैस्वाल, मंगल खिंवसरा, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड, सुधीर जाधव यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.