आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांची मनपात सायकलस्वारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार सायकल दिवस का नसावा? आठवड्यातून एक दिवस तरी इंधनावर धावणारी वाहने वापरू नये, असे आवाहन केल्यानंतर उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आज सायकलवर मनपात येत मोदींच्या सूचनेचे पालन केले. गेल्या महिन्यात राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्यातून एक दिवस वाहनांना सुटी देऊन सायकलचा वापर करावा, असे आवाहन केले होते.
यानंतर देशात त्याचे कोठे पालन झाल्याचे पाहायला मिळाले नाही; पण महिनाभरानंतर औरंगाबादेत भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सायकल वापराचे आवाहन प्रत्यक्षात आणले. मंगळवारी सकाळी १० वाजता ते सिडको एन येथील घरून इम्पोर्टेड सायकलवर टांग मारून मनपाकडे निघाले. जालना रोड, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, पैठण गेट, औरंगपुरामार्गे सात किलोमीटरची सायकलिंग करत पाऊण तासात मनपात दाखल झाले. दिवसभर मनपात काम करून सायंकाळी ते सायकलनेच घराकडे रवाना झाले. "दिव्य मराठी'शी बोलताना त्यांनी मोदी यांच्या आवाहनानुसार महिन्यातून किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करणार असल्याचे जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...