आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या राजीनाम्याची सेनेलाच घाई, महापौर-उपमहापौर पालिकेतून गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर त्र्यंबक तुपे नोव्हेंबरला राजीनामा देणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. महापौरांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून होणे अपेक्षित असताना सेनेचेच स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांना तुपे यांच्या राजीनाम्याची घाई झाल्याचे दिसते.
युतीतील करारानुसार ३१ ऑक्टोबरला महापौर तसेच उपमहापौरांचा राजीनामा अपेक्षित आहे, परंतु नेमके या दिवसांत दिवाळी आहे. तसेच ३१ ऑक्टोबरला सुटी आहे. त्यामुळे महापौर नोव्हेंबर किंवा त्यानंतर राजीनामा देतील, असे सांगितले जाते. त्यानंतर तुपे हे १५ दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यांनी जाण्याआधी राजीनामा दिला नाही तर महापौरपद १५ दिवस जास्तीचे सेनेकडे राहील. त्यामुळेच तुपे यांनी २९ ऑक्टोबरलाच राजीनामा द्यावा, असे सेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे, परंतु ऐन दिवाळीत राजीनामा नको, त्यानंतर बघू, असे भाजपकडून सांगितले जाते. सेनेच्या मुंबईस्थित नेत्यांनीही दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. ‘इतकी काय इमर्जन्सी आहे की ऐन दिवाळीत राजीनामा द्यावा’ असा सवाल संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी केला आहे. त्यामुळे नोव्हेंबरनंतरच राजीनाम्यावर चर्चा सुरू होईल. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी नवीन महापौर उपमहापौर निवडला जाईल, हे जवळपास स्पष्ट आहे.
महापौर कोण होईल, यावर भाजपमध्ये जोरदार चर्चा असली तरी आपल्या विरोधी गटाचा महापौर होणार असेल तर त्यापेक्षा सेनेचाच महापौर तेथे कायम राहावा, असे अनेक भाजपचे नगरसेवक बोलून दाखवतात. सेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मात्र महापौर कधी राजीनामा देतात, याचीच चर्चा करताना दिसतात. एकूणच महापौरांच्या राजीनाम्याची घाई हे भाजपपेक्षा सेनेलाच असल्याचे दिसते.

दरम्यान, महापौर तुपे उपमहापौर प्रमोद राठोड हे दोघेही अलीकडच्या काळात मनपात येण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे राठोड हे तर गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेकडे फिरकलेले नाहीत. राजीनामा द्यायचा तेव्हा दिला जाईल, परंतु ही जोडी पालिकेत का बरे येत नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बहुतांश वेळा ते एकतर मुंबईत असतात किंवा ते बाहेरगावी असल्याचे सांगितले जाते. नगरसेवकांचे फोनही या मंडळींकडून घेतले जात नाहीत. त्यावरूनही वेगळीच चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...