आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर तुपे यांना राजीनाम्याचे आदेश, ३० नोव्हेंबरला महापौर-उपमहापौरांचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीतील करारानुसार ३१ ऑक्टोबरला शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड राजीनामा देणार होते. १० नोव्हेंबरच्या आसपास भाजपचा महापौर विराजमान होणे अपेक्षित होते. परंतु शिवसेनेकडून भाजपला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
शनिवारच्या सर्वसाधारण सभेत महापौरांचा राजीनामा होईल, असेही सांगितले जात होते. परंतु तसेही घडले नाही. त्यामुळे आता सेनेचा महापौर अडीच वर्षे पदावर राहणार आणि पुढील अडीच वर्षाच्या टर्ममध्येच भाजपला एक वर्षासाठी महापौरपद मिळणार असे सर्वांनाच वाटले. परंतु रात्रीतून चक्रे फिरली आणि शिवसेनेला युतीचा धर्म आठवला. येत्या आठवड्यात सर्वसाधारण सभा घेऊन महापौर तुपे राजीनामा देतील, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी रविवारी सकाळी जाहीर केले.
शनिवारची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आता महापौरपदाचा निर्णय होणार नाही, असे सर्वांनाच वाटले होते. परंतु रविवारी सकाळी अनपेक्षितपणे दानवे यांनी हा निर्णय जाहीर केला. विशेष सभा बोलावून आमचे महापौर राजीनामा देतील, असे त्यांनी कळवले. यावर भाजपच नव्हे तर शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी खात्रीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडेही विचारणा केली असता तुपे यांना राजीनाम्याचा आदेश देण्यात आल्याचे कळले.
कशामुळे तडकाफडकी निर्णय? : सध्याचेमहापौरपद खुल्या प्रवर्गास आहे. त्यावर तुपे हेच राहावे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही इच्छा होती. त्यामुळेच दानवे हे तुपे यांच्या राजीनाम्यासाठी रेटा लावत नाहीत, असा आरोप भाजपमधून होत होता. शनिवारी महापौरांनी राजीनामा दिला नाही, तेव्हा हा आरोप आणखी तीव्र झाला. रात्री दानवे यांनी सेनेचे जिल्हाप्रमुख दानवे यांच्याशी संपर्क साधला अन् यातून मार्ग काढला पाहिजे, असे सांगितले. पालकमंत्री कदम, घोसाळकर या मंडळींनीही लगेच होकार दिला अन् रात्री साडेअकराला राजीनामा देण्याचे आदेश निघाले. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरला महापौर राजीनामा देतील. त्यानंतर सात दिवसांत नवा महापौर विराजमान होईल. या महापौरांना ११ महिन्यांपेक्षाही कमी काळ पदावर राहता येईल.

साडेसहा वर्षांनंतर भाजपकडे महापौरपद : २००७ते २०१० या अडीच वर्षांच्या कालावधीत विजया रहाटकर या भाजपच्या महापौर होत्या. त्यानंतर २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीत भाजपला महापौरपद मिळू शकले नाही. आता २०१६ मध्ये भाजपकडे हे पद येत आहे.

Ãविद्यमान महापौरउपमहापौरांचा राजीनामा अपेक्षितच होता. फक्त त्याला २० दिवसांचा विलंब झाला एवढेच. प्रदेशाध्यक्ष भाजपचा महापौर ठरवतील. किशनचंदतनवाणी, शहराध्यक्ष, भाजप.

करारानुसार सोपस्कार
Ãकरारानुसार महापौर राजीनामा देणार होते. फक्त आदेशाची प्रतीक्षा होती. श्रेष्ठींकडून आदेश येताच महापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. विशेष सभेत तेे राजीनामा देतील. आमच्यात कोणताही वाद नाही. सर्व सोपस्कार करारानुसारच होतील. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
बातम्या आणखी आहेत...