आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदेशाध्यक्ष दानवेंचा भाजपबरोबरच शिवसेनेलाही ‘चकवा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - त्र्यंबकतुपे यांच्या महापौरपदाच्या राजीनामा प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेसोबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही ‘चकवा’ दिल्याचे समोर येत आहे.
तुपेंचा राजीनामा घेतला जाऊ नये, यासाठी पालकमंत्री रामदास कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात युती झाली होती. भाजपकडून नेमका कोण महापौर होईल, हे दानवेही सांगू शकत नव्हते. त्यामुळे तुपेच बरे, अशी भूमिका त्यांनीही घेतली. त्यामुळे राजीनाम्याच्या विषयावर चर्चाच होत नव्हती. परंतु शनिवारच्या सभेत महापौरांनी राजीनामा दिला नाही. तेव्हा प्रदेशाध्यक्षांचा सेनेच्या भूमिकेला पाठिंबा असल्याची चर्चा सर्वदूर पसरली. हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता आल्याने दानवे यांनी सेनेच्या नेत्यांशी संपर्क साधून करार पाळला जावा, असे सांगितले अन् सेनेनेही राजीनामा देण्याचे ठरवले. दानवे यांच्या या खेळीने भाजपच्या नगरसेवकांबरोबरच शिवसेनेलाही ‘चकवा’ दिला. आता राजीनामा होणारच नाही, असे शिवसेनेबरोबरच भाजपचेही पदाधिकारी बोलू लागले होते. परंतु रविवारी सकाळी जेव्हा दानवे यांचा राजीनाम्याबाबतचा संदेश आला तेव्हा सर्वच चक्रावले.

राजूशिंदेंची भीती : भाजपकडेमहापौरपद आल्यास प्रबळ दावेदार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांच्याकडे हे पद जाईल, अशी छुपी भीती प्रदेशाध्यक्ष दानवे यांना होती. बागडेंच्या समर्थकाकडे पद जाण्यापेक्षा जालना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील रहिवासी तुपे हे कधीही चांगले, अशी दानवे यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी तुपेंच्या राजीनाम्याचा विषय लावून धरला नाही.

खैरेंना द्यायचा होता शह : तुपेयांचा राजीनामा घेण्यामागे सेनेतील एका मोठ्या गटाला खासदार खैरे यांना शह द्यायचा होता, असे समोर येत आहे. कारण पुढील अडीच वर्षांचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणार आहे. फक्त महिला की पुरुष एवढाच काय तो विषय शिल्लक आहे. पुरुषांसाठी जर खुले राहिले तर खासदार खैरे यांना आपले चिरंजीव ऋषिकेश यांना महापौर करायचे आहे. त्यासाठी खैरे हे मातोश्रीवर आपली प्रतिष्ठा पणाला लावतील, याची कल्पना सेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे या टर्मऐवजी पुढील टर्ममधून भाजपला एक वर्ष द्यावे, असे सेनेच्या एका गटाचे म्हणणे होते. त्याला प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा पाठिंबा होता. त्यामुळे ३१ ऑक्टोबरच्या पूर्वीपासूनच तुपे यांनी राजीनामा द्यावा, असे खैरे म्हणत होते.
मराठा कार्डचाही परिणाम?
तुपेयांच्या राजीनाम्याचा कालावधी जवळ येत असतानाच औरंगाबादसह राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघू लागले. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सेनेने तुपे यांना या पदावर बसवले. भाजपकडून मराठाच या पदावर येईल की नाही, याची खात्री दानवे यांना नव्हती. कारण त्यांच्याकडून जे ज्येष्ठ नगरसेवक या पदासाठी दावेदार आहेत ते मराठा नाहीत. त्यामुळे उगाच पुढील निवडणुकीत रोष नको म्हणून त्यांनी या विषयाकडे कानाडोळा केल्याचे समजते. पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे या मराठा मंडळींनी तुपे यांची तळी तेव्हाच उचलून धरली होती. त्याला दानवे यांनीही हातभार लावला होता.
बातम्या आणखी आहेत...