आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा पदाधिकाऱ्यांकडील बैठकांना महापौरांचा चाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापौर सभागृह नेत्यांतील छुपी सत्तास्पर्धा आणि दुसरीकडे भाजपशी स्पर्धा अशा स्थितीमुळे दोन्ही पक्षांचे सगळेच पदाधिकारी आपली ताकद दाखवण्यासाठी मनपात प्रत्येक विषयावर बैठका घेत आहेत. या बैठकांना चाप लावण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांनी कायद्यावर बोट ठेवत फक्त महापौर मनपा आयुक्तांनाच बैठका बोलावण्याची तरतूद असल्याचे सांगत इतरांनी बैठका घेऊन अधिकाऱ्यांचा वेळ खर्ची घालू नये, असा इशारा देणारे पत्रच महापौरांनी जारी केले आहे. यामुळे सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्या दालनात सतत होणाऱ्या बैठकांना आळा बसेल, असे दिसते.

महापालिकेतील महत्त्वाची पदे ज्या व्यक्तींना मिळाली आहेत, ते सारेच महत्त्वाकांक्षी असल्याने प्रत्येक जण मनपात दुसऱ्यापेक्षा वेगळे अधिक काही करण्याच्या शर्यतीत उतरला आहे. महापौरांनी नालेसफाईला हात घातला की उपमहापौर कचरा सफाईच्या कामात हात घालतात, तिकडे सभागृह नेतेही समांतरपासून इतर विषयांवर अग्रक्रमाने कार्यवाही करतात.
स्थायी समिती सभापती नवीनच असले तरी त्यांचेही विविध विभागांवर लक्ष असते. तिकडे एमआयएमचे विरोधी पक्षनेते जहांगीर खानही चमकदार कामगिरीसाठी तसे विषय हाती घेत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची या सर्वांमधील स्पर्धा अधिकाऱ्यांना पळायला लावत आहे.
सारेच पदाधिकारी सतत काही ना काही बैठका घेत असल्याने अधिकाऱ्यांचा त्यातच वेळ जात आहे. इतर पदाधिकाऱ्यांच्या या बैठकांना आळा बसावा त्यांच्या झपाट्याला लगाम बसावा यासाठी महापौरांनी आता नियमाचा आधार घेतला आहे.
महाराष्ट्र मनपा अधिनियमाच्या कलम चा आधार घेत महापौर आयुक्त हेच प्राधिकारी असल्याने त्यांनीच कामांचा आढावा घेणे, गरजेनुसार उपाययोजना करणे आदींसाठी बैठका घेणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...