आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor's Tupe Questions For Parallel Advisory Committee

आजवर कुठे होेती समिती, काय काय कामे केली, समांतरच्या सल्लागार समितीला महापौर तुपेंंचा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरचेकाम करणाऱ्या सल्लागार समितीला शहरात कार्यालय घेण्याचे तसेच संस्थाप्रमुखांना शहरात येऊन काम करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. या समितीला महापौरांनी शुक्रवारी बैठकीसाठी बोलावले होते. यात कधीच भेटलेल्या समिती सदस्यांना तुपे यांनी आपण इतके दिवस कुठे होता, काय काम केले, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर समिती सदस्यांनी कांचनवाडीला काम सुरू असल्याचे सांगितले.

महापौर त्र्यंबक तुपे यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी डिफर्ड पेमेंट सल्लागार समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक बोलावली होती. उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, भाजप गटनेते भगवान घडामोडे, नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन, मनोज बल्लाळ, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दिकी, उपअभियंता एस. पी. खन्ना, ए. बी. देशमुख आणि विविध प्रकल्प व्यवस्थापन कमिट्यांचे (पीएमसी) प्रतिनिधी उपस्थित होते. समांतरचे पीएमसी वगळता सर्व रस्त्यांच्या कामाचे पीएमसी उपस्थित होते. या वेळी कोल्हे यांना समांतरच्या पीएमसीला बोलावण्यास सांगितले असता त्यांनी आढेवेढे घेतले. मात्र, सर्वांनीच रेटा लावल्याने तीन तासांच्या अवधीनंतर समांतरच्या पीएमसीचे चार सदस्य आले. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त कार्यकारी अभियंता होनकळसे, अधीक्षक अभियंता यांच्यासह दोघांचा समावेश होता.

राठोड बनले आयुक्त
समांतरचेपीएमसी सदस्य आल्यानंतर ओळख परेड झाली. या वेळी भगवान घडामोडे यांनी विचारले, मला ओळखता का? समितीने नाही, असे उत्तर दिले. त्यावर मी घडामोडे. माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला गेला, असे सांगितले. त्यानंतर प्रमोद राठोड यांनी विचारले, मला ओळखता का सदस्य म्हणाले नाही. राठोड म्हणाले, मी आयुक्त आहे. त्यानंतर अभियंत्यांनी त्यांना नमस्कार केला. एवढ्या अनोळखी पीएमसीकडून शहरातील समांतरचे काम करण्यात येत असल्याने सगळ्याच सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. नंतर राठोड यांनी आपण उपमहापौर असल्याचे सांगितले.

पुण्याच्या संचालकांना फोन
महापौरतुपे यांनी थेट सल्लागार समितीच्या संचालकांना फोन करण्याची सूचना केली. होनकळसे यांनी पीएमसीचे पुण्याचे मुख्य संचालक पाठक यांना कॉल जोडून दिला तेव्हा तुपे यांनी आपण शहरात कधी आला होता, कोणती पाहणी केली, असे सवाल केले. त्यावर पाठक यांनी मी नऊ महिन्यांपूर्वी आलो होतो. कामाची पाहणी आमचे अधिकारी करतात, असे उत्तर दिले. त्यावर आपण शहरात येऊन काम बघावे, अशी सूचना तुपे यांनी केली. यावर पाठक यांनी देशभर काम असल्याने शहरात येणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती
समितीचेसदस्य पोहोचताच तुपे यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आपण एवढे दिवस कुठे होता, आपण काय काम केले, अशी विचारणा केली. यावर आम्ही कांचनवाडीला होतो. तेथे आमचे काम सुरू असल्याचा खुलासा सदस्यांनी केला. काय काम आहे आपले, असा प्रश्न प्रमोद राठोड यांनी केला तेव्हा आम्ही पाण्याच्या पाइपलाइनचे डिझाइन करतो, असे उत्तर आले. सदस्यांचे उत्तर ऐकून तुपे यांनी आपले काम पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन करणे, समांतरच्या कामावर नियंत्रण ठेवणे ही कामे असल्याचे सांगितले.