आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस वेबसाइटद्वारे लाखो रुपयांना फसवणारा निघाला एमबीए उत्तीर्ण, पोलिसांनी केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बोगस वेबसाइट तयार करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने पंधरा दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणात आता त्याचा साथीदार आणि मुख्य आरोपी हितेश कुंबळे (रा. मुंबई) यालाही ग्रामीण पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे हितेश हा एमबीए उत्तीर्ण असून अॅपमार्फत पैसे घेत असे. यापूर्वी अटक केलेल्या शेखर ओमकारप्रकाश पोतदार (३२, रा. जरिपटका, नागपूर) याच्या सहकाऱ्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला.
 
ऑगस्ट महिन्यात वडोदबाजार पोलिसांकडे रमेश गणेश कुलकर्णी यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. महा ई-सेंटर नावाच्या संकेतस्थळावर बस, रेल्वे तिकीट, मतदार प्रमाणपत्र, आधार बायोमेट्रिक मशीन, जन्माचा दाखला काढून देण्यासाठी एजन्सी सॉफ्टवेअर देऊ, असे आमिष आरोपींनी त्यांना दिले होते. तक्रारीनंतर महिनाभरात शेखरला अटक झाली. परंतु ज्या अॅपमार्फत पैसे ट्रान्सफर झाले त्या अॅप कंपनीला पोलिसांनी संपर्क साधला. त्यात हितेशवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असे डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. विभागीय पोलिस अधिकारी अशोक आमले, उपनिरीक्षक सय्यद मोहसीन, प्रमोद भिवसने, दत्ता तरटे, रवींद्र लोखंडे, प्रेम म्हस्के, भूषण देसाई, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनीही कारवाई केली.
दोघांनी मिळून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, आंध्र प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांतील सुमारे ८० लोकांना या संकेतस्थळाचा आधार घेऊन फसवले. अशा प्रकारे त्याने ४० लाख रुपयांचा गंडा घातला.
 
पोलिसांचे पत्र परस्पर चोरले
पोलिसांनीई-बिल पेमेंट गेटवे कंपनीशी पत्रव्यवहार केला होता, परंतु हितेश व्यवस्थापक असल्याने त्याच्याच हातात पत्र पडले. त्यामुळे त्याने ते पत्र परस्पर घरी नेऊन ठेवले. पत्रच मिळाले नसल्याने कंपनीने प्रत्युत्तर दिल्याने पोलिसांना संशय आला आणि अधिक तपास करता हितेशवरच संशय आला. हितेशच्या घरात पत्र सापडल्याचे सिंह यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...