आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या मेडिकलच्या विद्यार्थिनीची रेल्वेखाली आत्महत्या, मैत्रिणींनीच केला असह्य छळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वर्गमैत्रिणींनी अभ्यासाच्या नोट्स चोरल्याचा आरोप केल्याने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या प्रतीक्षा सीताराम वाघ (१९, रा. बारावी योजना, शिवाजीनगर) या युवतीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी औरंगाबादेत शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. वर्गमैत्रिणीशी नोट्सच्या कारणावरून झालेल्या वादातूनच प्रतीक्षाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिनेच पाठवलेल्या शेवटच्या एसएमएसमुळे समोर आले आहे.

प्रतीक्षाचे वडील मोतीराम हे गारखेड्यात एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक आहेत. एमबीबीएस प्रथम वर्षाला शिकणारी प्रतीक्षा अंबाजोगाईत वसतिगृहात राहत होती. प्रथम वर्षात परीक्षांमध्ये ती नेहमी प्रथम क्रमांक पटकावत असे. त्यामुळे मैत्रिणी तिला सतावत. २४ एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर तिघींनी प्रतीक्षाला लक्ष्य करत अभ्यासाच्या नोट्स चोरल्याचा गाजावाजा केला.

सुट्यांमध्ये पुढील परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबादेत आलेली प्रतीक्षा बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. तिचे कॉलेजमधील इतर मैत्रिणींशी बोलणे बंद होते. असे असले तरी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिचे मैत्रिणीला संदेश पाठवणे सुरूच होते. तिचा छळ करणाऱ्या युवतींच्या पालकांची महाविद्यालयाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रतीक्षाचे वडील मोतीराम यांनी केली आहे.

निराश प्रतीक्षाला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवण्यात आले होते
सुट्यांत आल्यापासून प्रतीक्षा निराश होती. याचे कारण माहिती करून मोतीराम यांनी "त्या' युवतींच्या पालकांशी संपर्क साधून तिघींना समजावून सांगण्याची विनवणीदेखील केली होती. तसेच तिला उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले होते.
तोपर्यंत वेळ निघून गेली
नोट्सच्या देण्याघेण्यावरून जीव देत असल्याचे प्रतीक्षाने एसएमएसने वर्गमैत्रिणीस कळवले होते. मैत्रिणीने हा एसएमएस वसतिगृह अधीक्षिकेच्या नजरेस आणून दिला खरा; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काही वेळातच अंबाजोगाई अधीक्षक कार्यालयाचा फोन खणखणला अन् औरंगाबादेत प्रतीक्षाने आत्महत्या केल्याची माहिती अधिष्ठाता सुनील घाटे यांना मिळाली.

.. तर ती वाचली असती
अात्महत्येपूर्वी प्रतीक्षाने वडिलांना जुने सगळे विसरल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडिलांनी २१ जूनला सोबत महाविद्यालयात जाऊ असे तिला सांगितले होते. मात्र, त्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. महाविद्यालयात आपण लवकर गेलो असतो तर कदाचित प्रतीक्षाचा जीव वाचला असता, असे तिचे वडील मोतीराम वाघ यांनी सांगितले.

अभ्यास वर्गाला जाते म्हणून गेली
सकाळी अभ्यास वर्गाला जाते म्हणून प्रतीक्षा घरातून बाहेर पडली रेल्वेखाली तिने उडी घेतली. रेल्वेपटरीवर मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. मात्र, मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटत नव्हती. पण बॅगमधील ओळखपत्रामुळे तपास लागला. तिच्या फोनचे कॉल रेकाॅर्ड मेसेजची तपासणी करण्यात येणार आहे.

वर्ग मैत्रिणींतील या वादाची माहिती प्रशासनाला नव्हती. प्रतीक्षाने कधी त्याची तक्रारही केली नाही. त्यामुळे हे प्रकरण आमच्यापर्यंत आलेच नाही. पूर्वकल्पना असती तर आपण पुढाकार घेऊन विद्यार्थिनींत समन्वय घडवून आणला असता.
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता,स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आत्‍महत्‍येपूर्वी रुममेंटला केला एसएमएस... मैत्रिणी नेमका काय त्रास देत होत्‍या... तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर हे करा... हिंमत हरु नका....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...