आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दोनमहिन्यांपूर्वी महापालिकेने शहरातील १४ वाॅर्डांत ओला कोरडा अशी कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करण्याची उघडलेली मोहीम अपयशी ठरली. मनपाने आवाहन करूनही या भागातील माॅल, हाॅटेल, रेस्टाॅरंट कार्यालयांनी त्याला दाद दिल्याने आता मनपा शनिवारपासून कचरा वर्गीकरण न करणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांवर दंडात्मक कारवाई करणार आहे.

२१ मे राेजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात एक बैठक बोलावली होती. त्यात शहरातील १४ वाॅर्डांत प्रायोगिक तत्त्वावर कचऱ्याचे संकलन ओला कोरडा असे करण्याचे ठरले होते. तसे आवाहनही मनपाने केले होते; पण त्याला कोणीच दाद दिल्याने ही मोहीम जागीच खुंटली होती. आता मनपाने कडक धोरण अवलंबण्याचे ठरवले असून शनिवारपासून (दि. ११ जुलै) या वाॅर्डांतील कचरा ओला कोरडा असा स्वतंत्र गोळा केला जाणार आहे. तसे करणाऱ्यांना मोठा दंड आकारण्यात येणार असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेतून घनकचरा व्यवस्थापन कचरा निर्मूलनासाठी निधी देण्यात येणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मनपा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत आहे. याशिवाय नारेगावचा कचरा डेपो हटवण्याबाबतही प्रयत्न सुरू असून तिसगावची जागा ताब्यात घेण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

रस्ता झाडणारी मशीन
शहरातीलरस्ते झाडण्यासाठी मनपाने ७५ लाख रुपये खर्चून यंत्र आणले आहे. ट्रकला खाली बसवलेल्या यांत्रिक झाडूने रस्त्यावरचा कचरा साफ करून तो ट्रकमध्ये भरला जाणार आहे.