आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसाधारण सभेचे आदेश म्हणजे बोलाचीच कढी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरांमध्येमीटरची सक्ती करू नका. पाणीपट्टी वसुली थांबवा, मीटर खरेदीची मुभा द्या, असे आदेश सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत देण्यात आले. मात्र, समांतरच्या ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेल्या करारात सर्वसाधारण सभेतील आदेश पालनाचा समावेशच नसल्याने सभेचेे आदेश म्हणजे बोलाचीच कढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदेश पाळण्याचे बंधन ठेकेदारावर नाही. आता करारात बदल करायचा असेल तर त्यासाठी ठेकेदार म्हणजे औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनी मनपा प्रशासनाला एकमेकांची सहमती घ्यावी लागणार आहे.

काल समांतरच्याच विषयावरून खासकरून वसुली मीटरवरून झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संतापाची धग पाहायला मिळाली. त्या वेळी बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय नंदकुमार घोडेले यांनी बोलताना नागरिकांना जाचक ठरणाऱ्या करारातील अटी बदलायला हव्यात, अशी भूमिका घेतली. दिवसभराच्या एकूण गदारोळात त्यांचे हे वक्तव्य झाकोळले गेले, तरी शिवसेनेने करारात सुधारणा करण्याची तयारी ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रत्यक्ष होऊ शकते का, याचा धांडोळा "दिव्य मराठी'ने घेतला असता करारात सुधारणा शक्य असल्याचे दिसून आले; पण पुढचा मार्ग अवघड आहे.

ठरावांना अर्थच नाही
समांतरचेकाम करारावर बोट ठेवूनच होत असल्याने फक्त व्यावसायिक नळांनाच मीटर लावा, वसुली मनपाने करावी, असे निर्णय सर्वसाधारण सभेने घेतले तरी त्यांची अंमलबजावणी अवघड आहे. कालच्या सर्वसाधारण सभेतही सगळ्या नगरसेवकांच्या म्हणण्यानंतर निर्णय घेण्याआधी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी आपण सदस्यांच्या मताशी सहमत नसल्याचे सांगत करारानुसार या बाबी कराव्याच लागतील, असे स्पष्ट केले. या सर्वांतून मनपाची हतबलताच दिसून येते.

पुढचे सारेच अवघड
सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, समांतर प्रकल्पाची किंमत वाढून १२०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असतानही ७९२ कोटी रुपयांत हा प्रकल्प करण्यास कंपनी तयार झाली. त्यामुळे पाणी देण्याआधी मीटर वसुली या माध्यमातून सहज हाती येणारी रक्कम सुधारणा केल्यावर काही काळापुरती बंद होऊ शकते. त्याचा आर्थिक फटका कंपनीला बसेल. दुसरीकडे, करारात काय बदल करायचे याबाबत मनपाचा कारभार पाहणाऱ्या सत्ताधारी विरोधकांचे एकमत होणे अशक्यप्राय वाटते. या सर्वांची संमती घेऊनच मनपा प्रशासनाला करारात सुधारण कराव्या लागतील. तोपर्यंत गाडे पुढे सरकू शकत नाही.

सुधारणेसाठी काय करावे लागेल?
मनपाऔरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनी यांनी एकत्र बसून वादग्रस्त विषयांवर समन्वयाने तोडगा काढल्यास करेक्शन आॅफ डीड करून करारात सुधारणा अंतर्भूत करता येऊ शकतात. नंदकुमार घोडेले म्हणाले की, वसुली, मीटर टँकर या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. याबाबत तरी करारात सुधारणा करता येऊ शकते. शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले की, मनपा कंपनी या दोघांनाही एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, तरच हे होऊ शकते.

काय होऊ शकतात सुधारणा?
करारातीलअट : कंपनीलापहिल्या वर्षात १० टक्के, पुढच्या वर्षी ४० नंतरच्या वर्षी उर्वरित असे शहरातील नळांना १०० टक्के मीटर लावायचे आहेत.
सुधारणा: नागरिकांनापाणी येण्याआधी भुर्दंड बसू नये यासाठी तीन वर्षांनंतर मीटर लावावेत.
अट: योजनासुरू झाल्याक्षणापासून पाणीपट्टी वसुली थकबाकी वसुली कंपनी करणार आहे.
सुधारणा: पाणीपट्टीवसुली पाणीपुरवठा योग्य होईपर्यंत मनपानेच करावी नंतर ते काम कंपनीकडे सोपवावे.
अट: टँकरसाठीबुकिंग करून जुन्या पावत्या दाखवून नोंदणी करावी. तसेच मनपाच्या ठरलेल्या दराने टँकरचा पुरवठा करावा.
सुधारणा: मागेलत्याला टँकर उपलब्ध करून द्यावा, पाणी येणार नसेल त्या ठिकाणी त्या दिवशी विनामोबदला टँकर पुरवठा करावा, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रमांना मोफत टँकर द्यावे.