आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना राबवल्‍या जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून अनेक उपक्रम राबविले जातात. विशेष म्हणजे औरंगाबादेत महिला सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांवर उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असून राज्यभरात अशा प्रकारचे उपक्रम व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत गुन्हेशाखेकडे येणारी प्रत्येक तक्रार गांभीर्याने तपासली जाते अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. पालक, महिला आणि मुलींनी कोणतेही भय न बाळगता या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
महिला सहाय्यक कक्षाची स्थापना
1. महिलांच्या कौटुंबिक अत्याचाराबाबत चौकशी करून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी महिला सहायक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच महिला सामाजिक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
2.महिला आणि मुलींच्या कौटुंबिक सुरक्षिततेसाठी समुपदेशन महत्त्वाचे असून त्याच्यासाठी कार्यशाळा आणि समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आत्मविश्वास वाढावा या करिता कराटे प्रशिक्षणही देण्यात येते.
3.महिलांना सहज तक्रार करण्यात यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, बाबा पेट्रोल पंप, निराला बाजार, रेल्वेस्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटर पोलिस चौकी, कॅनॉट गार्डन, विवेकानंद कॉलेज, एस. बी. कॉलेज, जिल्हा परिषद कार्यालय, विद्यापीठ गेट, मौलाना आझाद कॉलेज, पोलिस आयुक्त कार्यालय, प्रोझोन मॉल अशा एकूण १५ ठिकाणी, फेब्रुवारी २०१४ पासून तक्रार पेटी लावण्यात आली असून या तक्रारींवर दामिनी पथकाकडून तत्काळ कारवाई होते. या शिवाय अनेक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.