आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medha Patkar News In Marathi, AAP, Hailstorm, Farmer, Divya Marathi

गारपीटग्रस्तांच्या सांत्वनाचा देखावा करणे बंद करा, मेधा पाटकर यांचा सत्ताधा-यांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - स्वार्थासाठी वेळप्रसंगी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात. त्यांना सामान्य जनतेच्या समस्या व दु:खाशी काहीएक देणेघेणे नाही. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना पंचनामे करण्यासाठीसुद्धा लाच द्यावी लागते, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शनिवारी (22 मार्च) रोजी केला. रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. केवळ स्वार्थासाठी शेतकर्‍यांची विचारपूस व पाहणी करणार्‍यांनी त्यांच्यासाठी काय केले? असा खडा सवाल उपस्थित करत, केवळ देखावे करणे बंद करावेत, असा सूचक सल्ला त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिला.


या वेळी व्यासपीठावर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुभाष लोमटे, विजय शर्मा, मनीषा चौधरी, अण्णा खंदारे आदी उपस्थित होते. रांजणगाव शेणपुंजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मैदानात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही बैठक घेण्यात आली. या वेळी परिसरातील कामगार, शेतकरी आदींची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी कामगारांकरिता आम आदमी पार्टी भविष्यात भरीव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात प्रमुख्याने कंत्राटी कायदा संपुष्टात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग न अवलंबता एकजूट होऊन भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करावा, असे आवाहनही पाटकर यांनी शेतकर्‍यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले, तर आभार गंगाधर नखाते यांनी मानले.