आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Shops Owner Strike Cancel In Maharashtra

राज्यातील औषध विक्रेत्यांचा प्रस्तावित संप मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सरकारच्या आश्वासनानंतर राज्यातील औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांचा पुकारलेला संप तात्पुरता मागे घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर औषध विक्रेत्यांनी आपला संप तात्पुरता मागे घेतला आहे.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी व इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांचे अँलोपॅथी औषधांचे प्रिस्क्रिप्शन्स ग्राहय़ धरू नये, असे बजावत अन्न व औषधी प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशार्‍याचा निषेध म्हणून राज्यातील औषध विक्रेते 18 ते 20 जुलै काळात दुकाने बंद ठेवणार होते. राज्यात औषधी दुकानांची संख्या 50 हजारांच्या आसपास असून, औरंगाबाद शहरात 1200 मेडिकल स्टोअर्स आहेत.
'निमा’चा विविध मागण्यांसाठी आज बंद