आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Student Dr. Sneha Sikachi First In Maharashtra

‘शासकीय वैद्यकीय’ची विद्यार्थिनी डॉ. स्नेहा सिकची महाराष्ट्रात प्रथम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. स्नेहा सिकची हिने एमडी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला. डॉ. स्नेहा हिला बधिरीकरणशास्त्र विषयातील सुवर्णपदकही मिळाले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने मे 2013 मध्ये घेण्यात आलेल्या एमडी/एमएस या पदव्युत्तर परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात एमडी (बधिरीकरणशास्त्र) परीक्षेत तिने विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बधिरीकरणशास्त्र विभागाला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. या यशाचे र्शेय डॉ. स्नेहा सिकची हिने शिक्षकांना दिले आहे. या यशाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विभागातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.