आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूची औषधी 16 दुकानांत उपलब्ध; लक्षणे दिसताच उपचार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वाइनफ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंत ७० टक्के मृत्यू उपचार उशिरा सुरू झाल्याने होतात. यासाठी प्रमुख लक्षणे दिसताच स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करा. पॅथलॅबच्या निकालाची वाट पाहू नका. राज्यभराचा लोड आल्याने पुण्यात चाचणीला वेळ लागतो. अशात उपचारांना वेळ झाल्यास रुग्ण दगावतात. या वर्षी १५० मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे तत्काळ उपचार सुरू करा. शहरातील १६ औषधी दुकानांत यासाठीची औषधे उपलब्ध करून दिली आहेत, असे आरोग्य मंत्र्यांचे विशेष अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांनी सांगितले. 

इंडियन मेडिकल असोसिएशन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विद्यमाने आयएमए हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप औटे, आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, आयएमए अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. बिलोलीकर म्हणाले, स्वाइन फ्लू जनजागृतीअभावी महाराष्ट्रात मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातच उपचार घ्यावेत. डॉक्टरांनीही चाचणी अहवालाची वाट पाहता उपचार सुरू करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. सरकारी रुग्णालयात मधुमेही, कर्करोगग्रस्त, गरोदर स्त्रिया रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मोफत लसीकरण सुरू आहे. 

डॉ. औटे म्हणाले, पावसाळ्यात स्वाइन फ्लूचा मोठा संसर्ग होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कार्यशाळा घेऊन वैद्यकीय व्यावसायिक, सरकारी यंत्रणा यांच्यात जनजागृती करणे, औषधोपचार आणि लसी उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली होती. ३५० रुपयांत स्वाइन फ्लूची लस बाजारात उपलब्ध आहे. नागरिकांनी ती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
शहरातील या 16 औषधालयांत मिळेल औषधी 
विजयमेडिकल (समर्थनगर), मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च सेंटर (बजाज रुग्णालय), पंचशील मेडिकल (डॉ. हेडगेवार रुग्णालय), वरद फार्मसी (दर्गा रोड), स्वस्तिक मेडिकल (एन -२, सिडको), व्यंकटेश फार्मसी (एन -४, सिडको), आनंद मेडिकल (श्रद्धा हॉस्पिटल, गारखेडा), एमजीएम मेडिकल (एमजीएम रुग्णालय), मनोरमा मेडिकल हॉल, स्प्रे लँड एंटरप्रायजेस (बारुदगर नाला), आनंद मेडिकल (मनजितनगर), साईराम मेडिको (शहानूरवाडी), आदित्य मेडिकल (एन-१, सिडको), बसंत एजन्सी (बारुदगर नाला), भगीरथ डिस्ट्रिब्युटर्स (बारुदगरनाला). 
बातम्या आणखी आहेत...