आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधांचा 30 टक्के तुटवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवीन औषधी धोरणानुसार वेगवेगळ्या 348 औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, कमी किंमत झालेली अनेक औषधे नवीन दरांसह बाजारात उपलब्ध झाली नाहीत. त्याच वेळी किंमत कमी झालेली जुनी औषधे विक्रेत्यांनी कंपन्यांकडे पाठवल्याने रुग्णांना औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

नवीन औषधी धोरणाचा गोरगरिबांसह सर्वांनाच मोठा लाभ होणार आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाच्या, जीवरक्षक व अधिकाधिक प्रमाणात लागणार्‍या अशा 348 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. हे औषधी धोरण लागू झाले असले तरी धोरणानुसार किंमत कमी झालेली औषधे अद्यापही पूर्णपणे बाजारात उपलब्ध नाहीत. वैद्यकीय वतरुळातून मिळालेल्या माहितीनुसार, धोरणामध्ये समावेश असलेली 60 ते 70 टक्के औषधे आता बाजारात उपलब्ध असून सुमारे 30 टक्के औषधांचा तुटवडा कायम आहे. दोन ते तीन आठवड्यांपूर्वी गंभीर स्वरूपाचा तुटवडा होता.