आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यांच्या १५० कोटींसाठी पुढील आठवड्यात बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी १५० कोटी रुपये द्यावेत ही मागणी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण होऊ शकली नसली तरी हे पैसे मिळतील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी ते बीड येथे जाण्यासाठी विमानतळावर आले असता महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा "पुढीलआठवड्यातमुंबईला या, प्रस्तावाचा अभ्यास करून निधी देतो,’ असे आश्वासन देण्यात आले. रस्त्यांसाठी मनपाला १५० कोटी रुपये द्यावेत, या मनपाच्या जुन्याच प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आपण दसरा संपल्यानंतर मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे महापौर तुपे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि मनपाच्या तिजोरीची अवस्था लक्षात घेऊन राज्य शासनाने १५० कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्ताव वर्षभरापासूनच राज्य शासनाकडे पडून आहे.

औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय होऊन काही निधी मनपाला मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु राज्य शासनाने फक्त स्मार्ट सिटी योजनेसाठी मनपाला द्यावयाचा २५० कोटींचा वाटा देण्याचे जाहीर केले. रस्त्यांसाठी निधी देण्याबाबत या बैठकीत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. मात्र, बैठकीत निर्णय झाला नसला तरी मनपा पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचा पिच्छा सोडलेला नाही.

मुख्यमंत्री म्हणाले- मुंबईत या, नक्की निधी देतो
बीड येथे एकदिवसीय दौऱ्यासाठी जाण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी चिकलठाणा विमानतळावर उतरले. महापौर तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी त्यांची भेट घेऊन रस्त्यांच्या निधीची आठवण करून दिली. घाईत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नक्की निधी देतो, परंतु त्यासाठी प्रस्तावासह तुम्ही मुंबईला या, असे सांगितले. त्यानुसार पुढील आ‌ठवड्यात महापौर तुपे यांच्या नेतृत्वाखाली मनपा पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार असल्याचे स्पष्ट झाले. यात रस्त्यांसाठी १५० कोटी रुपये देण्याबरोबरच मनपा हद्दीत नव्याने दाखल होणाऱ्या २६ गावांना सुविधा देता याव्यात, यासाठीही निधी देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार आहे. या निधीचा आकडा दोन दिवसांत स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...