आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमित धार्मिक स्थळे नियमितीकरण समितीची आज बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- धार्मिकस्थळ नियमितीकरण समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात होत आहे. अतिक्रमणित धार्मिक स्थळ हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर समितीची ही तिसरी बैठक होत आहे. १३ विविध खात्यांचा समावेश असलेल्या या समितीचे अध्यक्ष पालिका आयुक्त आहेत. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार असून त्याआधी ही बैठक होत आहे. 

पालिकेने गत रविवारी प्रगटन देऊन धार्मिक स्थळांबाबत आक्षेप मागवले होते. गेल्या चार दिवसांत १७० जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. पूर्वीचे ८०६ आक्षेप दाखल झाले होते. शनिवारनंतर प्रत्यक्ष त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. आवश्यक असलेल्या आक्षेपांचीच सुनावणी होईल, असे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्वच आक्षेपांची सुनावणी होईल की नाही हे सांगता येत नाही. ८०६ आक्षेपांवर अभ्यास तसेच सर्वे करण्यासाठी आयुक्तांनी पूर्वीच सहा जणांचे पथक नियुक्त करण्यात आले. त्यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...