मुंबई- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासह शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीसंदर्भात निकष ठरविण्यासाठी ‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत सोमवार १९ जून रोजी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उच्चाधिकार समितीची ११ जून रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतील प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे महसूलमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती येत्या सोमवारी विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत थकीत कर्जमाफी निकष ठरवण्यासाठी चर्चा करणार आहे. बैठकीस चर्चेसाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू यांच्यासह संबंधित नेत्यांना निमंत्रित केले आहे.
हेही वाचा,