आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय पर्यटन विभागाची मेगा सर्किट योजना बारगळली, निधीच्या कमतरतेमुळे पर्यटनस्थळांच्या विकासाची अनेक कामे खोळंबली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ५६ कोटींचा प्रस्ताव पाठवला. केंद्राने मात्र २३ कोटी दिले. त्यातून कुठलीही कामे पूर्ण झाली नाहीत. दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, पाणचक्की, टुरिस्ट टॅक्सी स्टँड आणि बनी बेगम बाग ही कामेच रद्द करावी लागली, तर मजनू हिल परिसरातील रोझ गार्डन आणि रस्ता सौंदर्यीकरणाच्या कामाचे पार वाटोळे झाले आहे.
केंद्राच्या पीआयआयडीसी योजनेअंतर्गत एमटीडीसीमार्फत जिल्हा मनपा प्रशासनाने ५६ कोटींचा संयुक्त प्रस्ताव हेरिटेज आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्या मार्फत २०१० - ११ मध्ये केंद्र शासनाकडे पाठवला होता. या प्रकल्पासाठी ३१ मार्च २०१३ रोजी केंद्र शासनाने २३ कोटी ४३ लाख २० हजार इतक्या रकमेस मंजुरी दिली होती. त्यात एकूण ११ विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांचा समावेश होता. त्यापैकी एमटीडीसीने कोटी ८३ लाख आणि केंद्र सरकारने कोटी ६८ लाख असा एकूण कोटी ५१ लाख रुपयांचा पहिला टप्पा मेगा सर्किटसाठी दिला. यातून औरंगाबाद विभागातील ११ पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार होता. त्यातून चार पर्यटनस्थळांची विकासकामे पूर्ण केल्याचा दावा एमटीडीसीने केला. तर पाच पर्यटनस्थळांची विकासकामे निधीअभावी विभागीय आयुक्तांनाच रद्द करण्याची वेळ आली.
उर्वरित दोन पर्यटनस्थळांची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी इतर पर्यटनस्थळांचा निधी वळता करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याकडे एमटीडीसीने कानाडोळा केला, विलंब झाल्याने जी दोन कामे सुरू होती त्यांचेही अर्धवट कामामुळे पार वाटोळे झाले आहे. यात शहरातील रोझ गार्डन आणि एका रस्ता दुभाजकाचा समावेश आहे. पूर्वीच्या सरकारची योजना बंद झाल्याने निधीच नसल्याचे एमटीडीसीचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही नव्या सरकारच्या नव्या योजनांमार्फत निधीची मागणी करत आहोत, असाही खुलासा या विभागाने केला आहे.

पुढील स्लाईडवर वाचा... विलंबामुळे या दोन कामांचे वाटोळे
बातम्या आणखी आहेत...