आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कार उलटून चालक ठार चार गंभीर, खवड्या डोंगरालगत घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/वाळूज - भरधाव कार उलटून चालक ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नवीन मुंबई महामार्गावरील तिसगाव चौफुलीजवळ घडली. जखमींमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. संदीप मधुकर शेट्टी (२३) असे मृत चालकाचे नाव आहे.

कारचालक संदीप, नितीन गायकवाड, त्यांची मुलगी अर्चना (५), मुलगा नवीन (साडेतीन वर्षे) किरण (एक महिना, रा. सर्व भीमनगर, भावसिंगपुरा) हे पाच जण लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे इंडिगो कारने (एमएच २२, डी २४०१) येत होते. तिसगाव चौफुलीजवळील खवड्या डोंगरालगत वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली. यात चालक संदीप याचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन गायकवाड, अर्चना, नवीन किरण हे गंभीर जखमी झाले.
जखमींना नितीन गायकवाड यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस जमादार डी.एम. साबळे करीत आहेत.