आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आपण पाहिला का मेळघाटातील हा हिरवाईचा उत्‍सव, अशा नटल्‍या डोंगर, द-या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलदरा, अमरावती - विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेले मेळघाट अभयारण्‍य हिरवळीने बहरले आहे. हिरव्‍यागार पर्वतरांगा व ओसांडून वाहनारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. नुकत्‍याच झालेल्‍या पावसाने मेळघाटातील नद्या, ओढे भरून वाहत आहेत. शनिवार व रविवारी हौशी पर्यटक, छायाचित्रकार व अभ्‍यासक मेळघाटात भेट देत आहेत. या संग्रहात पाहूया अभयारण्‍यातील सुंदर फोटो.
मेळघाट अभयारण्‍यात 60 हून अधिक वाघ आहेत. देशातील इतर व्याघ्र प्रकल्पांच्‍या तुलनेत मेळघाटात वाघ पाहण्‍याचा आनंद काही औरच आहे. त्‍याचे कारण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची भौगोलिक रचनाच उंचसखल असल्‍याने येथे क्वचितच वाघाचे दर्शन होते. पण मेळघाटात केवळ वन्यप्राणीच नव्‍हे तर, तेथील निसर्ग व जैवविविधतेचा आनंद घेण्यासाठी गेल्यास आपला भ्रमनिरास होणार नाही. चला तर, मग या संग्रहातील फोटोंच्‍या माध्‍यमातून पाहूया कसे सजले मेळघाट..
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मेळघाट अभयारण्‍यातील सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...