आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं.सदस्याने थाटला वस्तीशाळेतच संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहामांडवा- परिसरातील इंदेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत हनुमाननगर वस्तीशाळेत ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पोकळे हे सुमारे चार वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असल्याने त्या विरोधात ग्रामसभेत 2 ऑक्टोबर 2010 रोजी ठराव पारित झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीने पुढे कोणतीच कारवाई न केल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती पोकळे हे चार वर्षांपासून वस्तीशाळेच्या खोलीमध्ये राहत असल्याने त्यांच्या स्वयंपाकाच्या धुराचा तसेच पाळीव जनावरांच्या मलमूत्राचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या पाळीव जनावरांमुळे वस्तीशाळेला गोठ्याचे स्वरूप आले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. याबाबत इंदेगाव ग्रामपंचायतीत हे अतिक्रमण हटवण्याबाबत 2010 मध्ये ठरावदेखील पारित झाला होता. मात्र, त्यानंतर अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने तक्रारदार कल्याण नवथर व अन्य नागरिकांनी लेखी व तोंडी स्वरूपात संबंधित ग्रामसेवकास याबाबत विचारणा केली असता,
मी शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालयास कळवले आहे, असे तोंडी उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कल्याण नवथर, एकनाथ नवथर यांनी झेडपीच्या सीईओंकडे केली आहे.
माझ्याकडे (24 डिसेंबर) तक्रार दाखल झाली आहे. यासंदर्भात संबंधित वस्तीशाळेवर विस्तार अधिकार्‍यांना चौकशीसाठी पाठवून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण बीडीओंकडे दाखल करणार आहे. कारण मला अतिक्रमण हटवण्याचे अधिकार नाहीत.
जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती.