आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Member Of Parliament Chandrakant Kaire Comment On Electricity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार खैरे यांची वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना तंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यात वीज कंपनीच्या वतीने पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही ठिकाणी पाऊस कमी असल्याने वीजपुरवठा सुरू राहिला तरच कपाशी हाती लागू शकते. मात्र, वेगवेगळी कारणे पुढे करून कंपनीच्या वतीने पुरवठा खंडित करण्यात येतो. हा पुरवठा सुरळीत ठेवा, अन्यथा कायदा नि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पोलिसांच्या जोरावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण पोलिसही शेतकर्‍यांचीच मुले आहेत, ते आमच्यावर लाठी चालवणार नाहीत, अशा शब्दांत खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना तंबी दिली.

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या मुद्दय़ावर आवाज उठवला. कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे पिण्यालाही पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. 50 टक्क्यांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या डीपींच्या परिसरातील पुरवठा खंडित करण्यात आल्याचा खुलासा कंपनीच्या वतीने करण्यात आला. गेले वर्ष दुष्काळाचे होते. त्यामुळे शेतकरी आजघडीला विद्युत देयक देऊ शकत नाही. आता त्यांची वीज कपात केली तर कपाशी हाती लागणार नाही, त्यामुळे भविष्यात तर ते बिल भरूच शकणार नाहीत. त्यामुळे या वेळी त्यांना सवलत देण्यात यावी आणि दिवाळीनंतर वसुली करावी, अशी सूचना लोकप्रतिनिधींकडून आल्यानंतर खैरे यांनी वरील आदेश दिले आहेत.

दक्षता समितीच्या आदेशानंतर पुरवठा खंडित करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. याउपरही असे प्रकार सुरूच राहिले तर आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावे लागेल आणि तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. वीज कंपनीचे अधिकारी पोलिसांच्या बळावर ही कारवाई करतात असा आरोपही खैरे यांनी केला.

शनिवारी बघतो
येत्या शनिवारी विद्युतीकरण समितीची बैठक असून त्यात कंपनीच्या कारभाराला नीट करतो, असे खैरे यांनी सांगितले. खैरे हे विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष आहेत.