आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रीकरणासाठी 16 वर्षांपूर्वी औरंगाबादेत दिवस मुक्काम; ‘ताज’ झाली होती विनोद खन्नाची शाही हवेली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादेत चित्रीकरण झालेल्या दिवानापन या चित्रपटातील एक दृश्य. - Divya Marathi
औरंगाबादेत चित्रीकरण झालेल्या दिवानापन या चित्रपटातील एक दृश्य.
औरंगाबाद- चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांनी ‘दिवानापन’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने औरंगाबादेत आठवडाभर मुक्काम केला होता. ‘ताज’ हाॅटेल ही चित्रपटातील त्यांची भव्य हवेली दाखवण्यात आली होती. कडेकोट बंदोबस्त करूनही त्यांच्या फॅन्सनी चित्रीकरणस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केलाच होता. 

सन २००१ मध्ये विनोद खन्ना, अर्जुन रामपाल, दिया मिर्झा यांच्या भूमिका असलेला चित्रपट आला होता. त्यात विनोद खन्ना यांनी दिया मिर्झा यांच्या वडिलांची भूमिका केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण शहरातील तेव्हाच्या ताज रेसिडेन्सी या पंचतारांकित हाॅटेलात झाले होते. या चित्रपटात ताज हाॅटेलचा दर्शनी भाग ही विनोद खन्ना यांची हवेली दाखवण्यात आली होती. याशिवाय अर्जुन रामपाल दिया मिर्झा यांच्यासोबतचे काही प्रसंग आत चित्रित करण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर रणवीर चौधरी यांच्या या हवेलीसमोर हेलिकाॅप्टरही उतरवण्यात आले होते. 

या साऱ्या चित्रीकरणासाठी विनोद खन्ना यांनी तेथे आठ दिवस मुक्काम ठोकला होता. ताजशेजारीच मौलाना आझाद महाविद्यालय असल्याने चित्रीकरण पाहाण्यासाठी गर्दी उसळू नये त्याचा चित्रीकरणात अडथळा येऊ नये यासाठी खास बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

औरंगाबादेतच करायचे मुक्काम...
ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर म्हणाले की, चित्रीकरणादरम्यान विनोद खन्नाशी एकदा भेट झाली होती, तेव्हा त्याने चित्रपटाशी संबंधित गप्पा मारल्या होत्या. मौलाना आझाद महाविद्यालयाचे फारुखी असकरी म्हणाले की, चित्रीकरणात अडथळे येऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांना तिकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आठ दिवस हे सुरू होते. ताज हाॅटेलमध्ये त्या काळी कार्यरत असलेल्यांनी सांगितले की, या चित्रपटानंतरही शिर्डीला जाण्यासाठी मुंबईहून औरंगाबादला आल्यावर विनोद खन्ना शहरात काही काळ थांबत, कधी मुक्कामही करत.
बातम्या आणखी आहेत...