आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदभाई श्रॉफ : कार्य हेच जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांची आज जयंती आहे.


श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण गोविंदभाई र्शॉफ एक कर्मयोगी, एक निरलस कार्यकर्ता, एक दीपस्तंभ, गांधी मूल्यांना जपणारे मार्क्‍सवादी विचारवंत, झुंजार कार्यकर्ते, एक महान व्यक्ती, ध्येयवादी आदर्श नेतृत्व, मराठवाड्याचा विश्वस्त, संपादक, सर्वांचे स्फूर्तिस्थान, एक कलारसिक, एक आदरणीय नेता, एक नि:स्पृह लोकनेता, विचारांचे शिरोमणी... क्षणभर मनात विचार येतो, भाई नसते तर....? गोविंदभाईंनी जीवनाच्या अखेरपर्यंत समाजसेवा केली. सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले.

भाईंनी आपल्या समग्र जीवनामध्ये सेवा हेच माध्यम मानले. त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सर्वंकष लढाईसाठी जनआंदोलने उभारली व ती यशस्वी करून दाखवली. त्यामागे त्यांचा स्वत:चा असा कुठलाही स्वार्थ वा हितसंबंध नसत. त्यामागे एक व्यापक लोकहिताची भावना दडलेली असे. त्यामुळे कृषी विद्यापीठ, रेल्वे रुंदीकरण अथवा वैधानिक विकास मंडळांची मागणी त्यांनी लावून धरली. त्यामागे त्यांचा मराठवाडा प्रदेशाच्या हिताचा व कल्याणाचा विचार हा अधिक होता. लोकहिताची जपणूक करणारे निर्मोही नेतृत्व असेच त्यांचे वर्णन करता येईल.

आपल्या अंगीकृत कार्यामध्ये साफल्य मिळविण्यासाठी ते र्शद्धापूर्वक वाटचाल करीत असत. संस्था हे सेवेचे माध्यम आहे. हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्या सर्व कार्यास आधुनिक लोकशाही मूल्यांचा आणि समाजवादी दृष्टीचा आधार होता. संस्थामार्फत शिक्षण आणि विकास यांच्या जोडीने जो एक महत्त्वाचा वारसा भाईंनी तरुण पिढीला दिला तो विचारांचा वारसा होता. शिक्षण समाजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या विकासाबरोबच नैतिक मूल्ये, वैयक्तिक आचारतत्त्वे यांच्याबद्दल त्यांची धारणा भक्कम होती. लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांनी फळाची आशा न धरता कार्य केले पाहिजे असा भाईंचा आग्रह होता.

भाई हे एक पत्रकारही होते. त्यांनी मराठी भाषेत केलेले लेखन मराठवाडा पत्रात प्रकाशित झाले. संघर्षपर्व व विकासपर्व या दोन संग्रहात ते समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांनी फ्रीडम पत्राचे संपादन केले. आचार्य अत्रे यांच्या नवयुग प्रेसमध्ये हे पत्र छापले जाई. नारायणराव लोहारेकर हे या पत्राचे व्यवस्थापक होते. पत्रपंडित टी.व्ही. पर्वते हे संपादक म्हणून कार्य करत. कीपिंग टॉर्च ऑफ फ्रीडम बर्निंग हा भाईंचा लेख खूप गाजला होता. आपले ऐतिहासिक कार्य पूर्ण करून डिसेंबर 1949 मध्ये फ्रीडम थांबले.