आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकसारख्‍या नावाचा फायदा घेऊन जमीन गहाण ठेवाणा-यांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकसारख्या नावाचा फायदा घेत जागेची कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवून त्यावर तीन लाखांचे कर्ज उचलणार्‍या चौघांसह बँक अधिकारी व उपनिबंधकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

बायजीपुर्‍यातील व्यापारी अब्दुल करीम अब्दुल रहीम अब्दुल कादर अब्दुल्लाह अमोदी यांना रशीदपुरा मजनूहिल येथील 111.48 स्क्वेअर फुटाचा प्लॉट ऑक्टोबर 2010 मध्ये विक्री केला. अमोदी यांनी काही दिवसांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेऊन या प्लॉटच्या नामांतरासाठी अर्ज केला होता. त्या वेळी व्यापार्‍याचे नाव वापरून रिक्षाचालक अब्दुल करीम अब्दुल रहीम, मोहंमद मुश्ताक रफिक अहमद (35), अन्सारी तमिजोद्दीन फयाजोद्दीन (सर्व रा. गणेश कॉलनी), खान नजीर अहमद गुलाम अहेमद आणि सिडको टाऊन सेंटरच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शाखा व्यवस्थापक आणि तत्कालीन निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांनी संगनमत करून बँकेकडे जागा गहाण ठेवत तीन लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यापार्‍याने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी करत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे नुकतेच आदेश दिले. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एच. डी. पांचाळ करीत आहे.