आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercedes Car Trip For Slum Area Children\'s In Aurangabad

JOY OF GIVING: गरीब मुलांची ऐतिहासिक, अविस्मरणीय सफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’ आणि लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ही मर्सिडीझ सफर आयोजित करण्यात आली होती. या सफरीत कचरावेचक, मनपा शाळांतील गरीब विद्यार्थी सहभागी झाले होते.


ज्या कार रस्त्यातून जातानाच बघायच्या, त्या कारमधून चक्कर मिळणार याची उत्सुकता मुलांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होती. मोटारींची दारे उघडताच पटापट ड्रायव्हर काकांच्या शेजारी किंवा मागे खिडकीपाशी जागा पटकावण्याची मुलांमध्ये लगबग उडाली. आलिशान मर्सिडीझ, बीएमडब्ल्यू, जग्वारमध्ये टपावरील काच अर्थात सनरूफ सरकवताच त्यातून बाहेर पाहण्याचा आनंद या बालकांनी घेतला. काही धीट मुलांनी आपणहून संपूर्ण 13 किमीच्या या प्रवासात सीटवर उभे राहत व सनरूफमधून पाहत शहराची सफर केली. गरीब मुलांनी केलेली ही सफर ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली.

व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...