आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभाग बदनाम, काम प्रामाणिकपणे करा : भोगे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महसूल विभाग खूप बदनाम आहे. सातबाराच्या रेकॉर्डची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक अधिकाऱ्यांना महसुली कामांऐवजी अ-महसुली कामे करावीशी वाटतात. यापुढे अशा कामांचा ताळेबंद मोजण्याची गरज आहे. या विभागाची प्रतिमा बदलण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा, असा परखड सल्ला माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी दिला.
गेल्या ६२ वर्षांत प्रथमच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने मंगळवारी महसूल प्रबोधिनीत प्रथमच माजी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह मराठवाडा विभागातील गुणवंत अधिकारी, वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. अकरा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बारा अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना भोगे बोलत होते.

ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यातील सर्व सनदी अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार केला. भुजंगराव कुलकर्णी, जयंतराव देशपांडे, प्रभाकर कुर्से, कृष्णा भोगे, आर.के. पिंगळे, ए.एन. होगे, भास्कर मुंडे, रामराव शिनगारे, सुभाष लोळगे, आर.के. गायकवाड, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी एम.आर. कराड, आर.जी. महाजन, पी.के. पुंडे, नामदेवराव जोगदंड, भगवानराव गुट्टे, भगवानराव लांडगे, के.बी. गवळी, डी.एन. वानोळे, नामदेवराव जाधव, गुलाबराव मोरे, धनराज केंद्रे, किसनराव लवांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महसुलाचारोल बदलतो आहे
भास्करमुंडे म्हणाले, पूर्वी आयसीएस असे पद होते. त्यात बदल होऊन आयएएस झाले. आता त्याचे नामकरण प्रशासकीय अधिकारी झाले. पुढे आपली भूमिका सुविधा देणारी राहणार आहे. आपली सेवा लोकाभिमुख होत असल्याने अधिकाऱ्यांचा रोलही काळानुरूप बदलत आहे. आम्हाला जे जमले नाही ते दांगट यांनी करून दाखवले असे सांगत त्यांनी दांगट यांचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप दांगट यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. सर्वच ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना ऋषितुल्य म्हणत त्यांना वंदन केले. सूत्रसंचालन अनुया दळवी यांनी केले.
महसूल प्रबोधिनीचे सभागृह गर्दीने फुलून गेले होते. व्यासपीठावरील सर्वच ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा सत्कार विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केला. सर्वांना उत्सुकता होती ती शंभरीकडे वाटचाल करणारे भुजंगराव कुलकर्णी यांच्या भाषणाची. त्यांनी माइक हातात घेतला अन् पाऊण तास उभे राहून अनुभव सांगितले. १९३० ते १९८० पर्यंतचा अनुभव अन् सध्याचा काळ अशी साखळीच त्यांनी मांडली. १९३४ साली औरंगाबादेत फक्त तीनच चारचाकी होत्या. तेव्हा खूप कमी वर्दळ होती. आज लाखाच्या वर गाड्या पाहिल्या की त्या आठवणी स्वप्नवत वाटतात.

बातम्या आणखी आहेत...