आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप पोहोचला नाही म्हणून पाठीवर दप्तर! शाळांमध्ये वाचन कट्टे आणि धम्माल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; मुलांचेदप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे एक दिवस तरी त्यांची या ओझ्यापासून सुटका व्हावी म्हणून शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी दप्तराविना शाळा भरवून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते.
पण दप्तराची सवय लागलेले अनेक विद्यार्थी सकाळीच दप्तराच्या ओझ्यासह शाळेत दाखल झाले. तर काही शाळांत निरोप मिळाल्याने विद्यार्थी दप्तराचे ओझे घेऊन हजर झाले. प्रार्थनेच्या वेळी प्राचार्य आणि शिक्षकांनी "नो बॅग डे'विषयी सांगताच अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडून "अरेच्चा! मी तर विसरलोच!' असे उद्गार निघाले. मात्र आज गुरुजी वर्गात शिकवणार नाहीत. केवळ वाचन करायचे, असे सांगितले गेल्याने मुले आनंदी झाली.

अशाशाळा असे उपक्रम
मिसाइलमॅनच्या कर्तृत्वाचे प्रदर्शन तरुणांना नेहमीच मोठी स्वप्ने पाहा आणि ती सत्यात उरवण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश डॉ. कलाम यांनी दिला आहे. हाच संदेश प्रेरणास्रोत मानत शहाबाजार येथील इकरा उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. कलामांच्या नावाने वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन भरवले होते. शिवाय भारत महासत्ता कसा होईल, याचे दर्शन घडवणारे स्मार्ट सिटीचे मॉडेल ठेवण्यात आले होते.

शारदा मंदिरात झाले कीर्तन
नऊवारीलुगड्यात आलेल्या वर्गमैत्रिणींच्या हाती टाळ, मृदंग आणि पेटी बघून शारदा मंदिर कन्या शाळेतील इतर विद्यार्थिनी अवाक् झाल्या. या विद्यार्थिनींनी "विज्ञान भास्कर येता प्राचीवर अज्ञान अंधार दूर करी' हे कीर्तन गायले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे या कीर्तनातून स्मरण करण्यात आले. शाळेत ग्रंथप्रदर्शन आणि वाचन कट्टाही भरवण्यात आला.

बच्चों की दुनिया
शहाबाजारयेथील मनपाच्या उर्दू शाळेत रीड अँड लीड इंडिया'च्या वतीने बच्चों की दुनिया हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावाने प्रकाशित होणारे प्रेरणादायी गोंष्टींचे पुस्तक भेट देण्यात आले. सकाळी ग्रंथप्रदर्शनही भरवण्यात आले.

दोनहजार पुस्तके भेट
शहरातीलसरस्वती भुवन विद्यालयातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच ज्या मुलांना अवांतर पुस्तके मिळत नाहीत अथवा जी मुले पुस्तके घेऊ शकत नाहीत, अशा बालसुधार गृहातील मुलांसाठी शाळेच्या वतीने दोन हजार पुस्तके भेट देण्यात आली.

आदर्शव्यक्तींचा पडतो प्रभाव
आजचीमुले गंभीरपणे विचार करतात. मुलांना नेमकी कोणती पुस्तके आवडतात या संदर्भात एक सर्व्हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. त्यात निवडक २२५ पुस्तकांचीही यादीही प्रसिद्ध केली आहे. आदर्श व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. त्यामुळे वाचनातून आचार आणि विचारांची प्रगल्भता वाढते. हेरंबकुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

काळानुरूप वाचनाच्या आवडी बदलल्या आहेत. आज मी "मिट्टी से हीरा' हे पुस्तक वाचले. या पुस्तकात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अशी कथा आहे. मी इतरांना पुस्तके भेट देण्याचा संकल्प मी केला आहे. गुलफिशा,विद्यार्थी

रोज अभ्यासाची पुस्तके वाचतो. परंतु आज पहिल्यांदा अभ्यास करा म्हणणारे शिक्षक तुम्हाला आवडेल ते वाचा, असे सांगत होते. आजचा दिवसच काही निराळा होता. मिसमाबानो, विद्यार्थिनी