आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर रस्त्यांची यादी अर्थमंत्र्यांकडे, महापौर घडामोडेंनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापौर भगवान घडामोडे यांनी मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत शहरातील रस्त्यांसाठीच्या निधीबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यातील १५० कोटी रुपये देण्यास अर्थमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, लवकरच हा निधी वितरित करण्याचा शासनादेश मिळेल, असे घडामोडे यांनी सांगितले.
 
घडामोडे यांनी शनिवारी महापौर बंगल्यावर स्थानिक आमदारांची बैठक बोलावून रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली होती. आमदारांनी रस्त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि मंगळवारी मुंबईत पुन्हा बैठक घ्यावी, असे ठरले होते. या बैठकीला आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि कार्यकारी अभियंता सिकंदर अली उपस्थित होते. घडामोडे यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशीही चर्चा केली. 

या वेळी आमदार अतुल सावे त्यांच्यासमवेत होते. राजकीय वाद नको म्हणून घडामोडे यांनी मुंबईत आमदार सतीश चव्हाण, इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली. रस्त्यांसाठी १५० कोटी रुपये देण्याचे मुनगंटीवार यांनी औरंगाबादेत जाहीर केले होते. अधिकृतपणे त्यांनी पैसे वितरित होण्याबाबतची प्रक्रिया मात्र सुरू झालेली नव्हती. ती तातडीने सुरू करावी, असे घडामोडे यांनी सांगितले. 

आठवडाभरात हा निधी पालिकेला मिळू शकेल. या १५० कोटी रुपयांमध्ये नेमके कोणते रस्ते करण्यात येणार आहेत, हेही लवकरच स्पष्ट होईल. कोणत्याही परिस्थितीत निधी प्राप्त झाल्यानंतर महिनाभरात रस्त्याची कामे सुरू करायची असल्याचे महापौरांनी सांगितले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...