आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्पणदिनी पत्रकार जतीन देसाई यांचे व्याख्यान, एमजीएमच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : एम जी एम वृत्तपत्रविद्या जनसंवाद महाविद्यालय तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारीला दर्पण दिनानिमित्त मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या गौरव करण्यात येणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांची प्रमुख उपस्थिती असेल. 
 
जतीन देसाई हे भारत-पाक पीपल्स फोरमचे भारताचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. ते भारत पाक संबंध आणि पत्रकारांची संवेदनशीलता या विषयावर संवाद साधतील. 
यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार शांताराम जोशी, विद्याभाऊ सदावर्ते, संतोष महाजन, नागेश गजभिये, नागनाथ फटाले, सुभाषचंद्र वाघोलीकर, आरिफ शेख, अरविंद वैद्य, अशोक उजळंबकर, गोपाळ साक्रीकर यांचा सत्कार होणार आहे.
 
एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात सकाळी ११ वाजता गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांनी कळवले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...