आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाक्रिटिकॉन परिषदेचा समारोप; ८०० डॉक्टर सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अतिदक्षता विभागाशी संबंधित विविध विषयांचा ऊहापोह करणा-या महाक्रिटिकॉन या परिषदेचा रविवारी (ता. २१) समारोप झाला. दोन दिवसांपासून एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये सुरू असलेल्या या परिषदेत राज्यभरातून ८०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.
दोन दिवसांमध्ये अतिदक्षता विभाग आणि अतिदक्षता औषधशास्त्र या दोन शाखांशी संबंधित विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने झाली. अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. शिवकुमार अय्यर, मुंबईतील डॉ. अशित हेगडे, डॉ. अतुल कुलकर्णी, ऑस्ट्रेलियामधील डॉ. मायकेल लॉरी यांनी या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती लावली. अतिदक्षता विभागाचे कामकाज आणि उपचारपद्धती ग्रामीण भागातील डॉक्टरांपर्यंत पोहोचले पाहिजे, तसेच सर्वसामान्य रुग्णांनाही माहिती दिली पाहिजे, असे मत या परिषदेच्या निमित्ताने तज्ज्ञांनी व्यक्त केले. एमआयटी हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, कमलनयन बजाज, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल व युनायटेड सिग्माच्या पुढाकारातून ही परिषद झाली. या परिषदेचा मराठवाड्यातील डॉक्टरांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया परिषदेचे अध्यक्ष डॉ. आनंद निकाळजे, डॉ. समीध पटेल यांनी व्यक्त केली.