आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चे कंपनीने दिलखुलासपणे केला रॅम्पवॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘रघुपतीराघव राजाराम’ या भजनावर ताल धरत बच्चे कंपनीने रविवारी (२ ऑक्टोबर) लक्षवेधी रॅम्पवॉक केला. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या खादी फॅशन शोमध्ये क्लोव्हर डेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गांधी जयंतीनिमित्त रविवारी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विभागातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सकाळी ७.३० वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. संस्थेचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, स्नेहलता दत्ता, एमजीएम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्राचार्य सुधीर देशमुख उपस्थित होते.
नाटकांतून स्वच्छतेचा संदेश : यानंतरविद्यार्थ्यांनी "वैष्णवजणतो तेणे काहीये जो’ गीत सादर केले. "खरातोएकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’,"एकला चलो रे’, "रघुपतीराघवराजाराम’ या गीतांनी वातावरण भारून टाकले. प्रा. भक्ती बनवसकर, श्रीकांत गोसावी, सूर्यकांत शेजूळ यांनी साथ दिली. संत बलवीरसिंग सिंचेवाल, महात्मा गांधी जीवन आणि एमजीएम खादी रिसर्च सेंटरवर आधारित तीन माहितीपट या वेळी दाखवण्यात आले. पत्रकारिता महाविद्यालय जेएनईसीच्या विद्यार्थ्यांनी नाटकांतून स्वच्छता संदेश दिला.
खादीचा प्रचार हाच उद्देश
खादी सेंटरच्या वतीने सादर करण्यात आलेला आगळावेगळा फॅशन शो आकर्षणाचे केंद्र ठरला. खादीची पारंपरिक तसेच अत्याधुनिक वस्त्रप्रावरणे परिधान करून क्लोव्हर डेल स्कूलचे विद्यार्थी रॅम्पवर अवतरले. खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा या फॅशन शोचा उद्देश होता. यातील सर्व वस्त्र येथील कारागिरांनी तयार केली होती. ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले.
बातम्या आणखी आहेत...