आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमजीएमचे पार्किंग रस्त्यावर आले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भले मोठे रुग्णालय, 50 एकराचा प्रशस्त परिसर तरीही एमजीएम अर्थात महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल चारचाकी गाड्यांना रस्त्यावरच पार्किंग करायला भाग पाडते. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसह अन्य लोकांना बाहेरच गाड्या पार्क कराव्या लागतात. परिणामी रुग्णालयाबाहेर रस्त्यावर चारचाकी वाहनांची भली मोठी रांग दिसते. विशेष म्हणजे पहिल्या रांगेशेजारी आता दुसरी रांगसुद्धा सुरू झाली आहे. यामुळे पार्किंग मोठी आणि रस्ता छोटा असे चित्र आहे. एरवी इतर ठिकाणी रस्त्यावरील गाडी जामर लावून ओढून नेणार्‍या वाहतूक पोलिस शाखेने एमजीएमच्या समोरील या रस्त्यावर मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

सेव्हनहील या भागातील सिडकोकडे जाणार्‍या मार्गावर एमजीएम रुग्णालय आहे. दुचाकी पार्क करण्यासाठी रुग्णालय परिसरात जागा आहे. मात्र, चारचाकी गाड्या रस्त्यावरच लावाव्या लागतात. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नागरिक या अवैध पार्किंगसंदर्भात डीबी स्टारकडे तक्रारी करत आहेत. त्यानंतर चमूने स्वत: पाहणी करून ही समस्या जाणून घेतली. सेव्हन हिलकडून एमजीएम रुग्णालयासमोरील रस्त्यावरून सिडकोत जाण्यासाठी दुहेरी रस्ता आहे. या रस्त्याकडे वळतानाच रुग्णालयासमोर डाव्या बाजूला चारचाकी गाड्यांची रांगच दिसते. या ठिकाणी वळण घेताना वाहनधारकांची अडचण होते त्यामुळे हा धोक्याचा स्पॉट तयार झाला आहे.