आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातल्या 5490 गावात मनरेगाच्या ग्रामसभा, विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात मनरेगाची कामे वाढावीत यासाठी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बुधवारी महिलांच्या विशेष सभा पार पडल्यानंतर गुरुवारी मराठवाड्यात सर्वत्र सर्वसाधारण सभा पार पडल्या. दुपारी बारा वाजेपर्यत तब्बल ४९८० ग्रामसभा सुरु झाल्या होत्या. दिव्य मराठीच्या बातमीमुळे  विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळेवर सभा सुरु करण्याचे आदेश दिले होते.
मराठवाड्यात २०१६-१७ मध्ये ४६७ कोटी रुपये फेब्रुवारीमध्ये मनरेगावर खर्च करण्यात आले होते. हा निधी १५०० कोटीपर्यंत नेण्याचे उदिष्ट विभागीय आयुक्तांनी ठेवले आहे.

८३ टक्के गावात सभा दुपारीच सुरु
गुरुवारी मराठवाड्यात ६६४३ गावात ग्रामसभेचे नियोजन करण्यात आले होते. दिव्य मराठीने बातमी प्रकाशीत केल्यानंतर सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  वेळेवर सभा घेण्याचे तसेच ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांनाही सभा सुरु झाल्याचे रिपोर्ट करण्याचे आदेश दिले होते. मराठवाड्यातल्या ६६४३ ग्रामपंचायतीपैकी ५४९० गावात दुपारी बारा वाजता सभा सुरु झाली होती.  तर काही ठिकाणी दुपारी दोन वाजता,चार वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता देखील ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्याची माहिती प्रशासनाला अजून प्राप्त झाली नाही.
 
३९ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी होणार ग्रामसभा
औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात काही तांत्रीक कारणामुळे सभा झाल्या नाहीत. यामध्ये औरंगबाद जिल्ह्यात सहा आणि जालना जिल्ह्यात ३३ गावात सभा झाल्या नाहीत. या ग्रामसभा शुक्रवारी होणार आहेत.
 
मनरेगांवर पहिल्यांदाच झाल्या एवढ्या ग्रामसभा
केवळ मनरेगा या विषयावर मराठवाड्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात या निमीत्ताने पहिल्यांदाच मनरेगांच्या योजनांची माहिती गावकऱ्यासमोर आली आहे.   त्यामुळे ग्रामिण भागात वैयक्तीक योजना आणि ग्रामविकासाच्या  योजना देखील गावात पोहोचणार आहेत. अनेक ठिकाणी योजना गावकऱ्यासमोर आल्यामुळे ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...