आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवळाईत म्हाडाची १२२ घरे शिल्लक!, आमदार, खासदार, पत्रकार, माजी सैनिक कोट्यातून अर्ज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवळाई परिसरातील म्हाडाच्या (सर्व्हे नं. ७४) ४०४ घरांसाठी गुरुवारी (४ जून) सोडत काढण्यात आली. अल्प उत्पन्न गटातील नऊ प्रकारच्या घरांसाठी २८२ अर्ज आले होते. यापैकी आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेली घरे तसेच पत्रकार माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या घरांसाठी अर्जच प्राप्त झाले नाही. त्यामुळे १२२ घरे शिल्लक राहिल्याने या घरांसाठी नव्याने स्वतंत्र सोडत काढली जाणार असल्याचे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले.

देवळाई परिसरातील सर्व्हे नं. ७४ मध्ये रेणुकामाता मंदिरापासून दोन कि. मी. अंतरावर म्हाडाच्या घरांचा प्रकल्प आहे. साडेसात हेक्टर जागेवर म्हाडाचा गृहप्रकल्प असून, यातील शिल्लक राहिलेल्या जागेवर म्हाडाने अल्प उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली होती. अनेक प्रकल्पात सिडको अथवा म्हाडाकडून प्रारंभी अर्ज मागविले जातात नंतर सोडत काढली जाते. परंतु देवळाई परिसरातील अल्प उत्पन्न गटातील ४०४ घरे म्हाडाने बांधून तयार केल्यानंतर महिनाभरापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. घरांसाठी २९ एप्रिल ते २९ मे २०१५ दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या घरांची सोडत म्हाडाच्या वतीने काढण्यात आली.

अल्प उत्पन्न गट मध्ये आठ घरांमधील सात सर्वसाधारण घरांसाठी १४ अर्ज आले होते. यामध्ये सात जणांसाठी यशस्वी सोडत काढण्यात आली तर सात जणांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या गटातील सोळा घरांसाठी सहा अर्ज आले होते. तिसऱ्या गटातील आठ घरांसाठी पंधरा अर्ज प्राप्त झाले होते. यात सर्वसाधारण घरांसाठी सोडत काढण्यात आली. सात जण यशस्वी झाले तर सात जणांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले. चौथ्या गटातील बारा घरांसाठी तीन अर्ज आले होते. पाचव्या गटातील सोळा घरांसाठी सतरा अर्ज आले. यातील सर्वसाधारण दहा घरांसाठी सोडत काढण्यात आली तर सात जणांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले. एक जण अनुसूचित जाती राखीवसाठी असलेल्या घराच्या सोडतीत यशस्वी झाला. सहाव्या गटातील ६२ घरांसाठी अनुसूचित जाती तीन, सर्वसाधारण १८ शासकीय कर्मचारी एक असे अर्ज आले होते. सातव्या गटात दोनपैकी एक राखीव जागेसाठी अर्ज आला नाही. एक सर्वसाधारण जागेसाठी सोडत काढण्यात आली. एकास प्रतीक्षेवर ठेवण्यात आले. आठव्या गटात ३२ घरांसाठी अकरा अर्ज आले सोडतीत सर्व यशस्वी ठरले.

२४८ पैकी १२४ अर्ज
अल्पउत्पन्न गटातील २४८ घरांसाठी म्हाडाकडे १२४ अर्ज सर्वसाधारण गटातून यशस्वी ठरले तर २४ प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी २३, अंध अपंगासाठी राज्य शासनाचे कर्मचारी जण सोडतीत यशस्वी ठरले. सोडतीसाठी म्हाडाचे कार्यकारी अभियंता के. एम. कोठारे, उपअभियंता धीरजकुमार जैन, पी. ए. सोनवणे, मालमत्ता अधिकारी एस. बी. हिवराळे, समाजकल्याण अधिकारी साळवे, मंडळ अधिकारी रमनवार आदींची उपस्थिती होती. सोडत यशस्वितेसाठी डी. बी. लांबतुरे, नरेश गव्हाणे, आर. व्ही. चव्हाण, एस. के. राऊत, एन. आर. कुलकर्णी, धीरज सावजी, राजेश हिंगमिरे, रूपेश जायभाये आदींनी परिश्रम घेतले.