आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षत्रवाडीत पाच एकरांवर म्हाडा बांधणार 320 फ्लॅट्सची वसाहत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद - नक्षत्रवाडीत म्हाडा ३२० फ्लॅट्सची वसाहत दोन वर्षांत बांधणार आहेे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत होणाऱ्या या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ही माहिती देण्यात आली.
 
या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, सुभाष झांबड, प्रशांत बंब, अतुल सावे, नगरसेविका कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, म्हाडाचे मुख्याधिकारी डॉ. अनिल रामोड आदींची उपस्थिती होती.
 
बागडे म्हणाले की, कमी जागेत जास्त कुटुंबांना राहता येईल, अशा पद्धतीने इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज अाहे. प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील १४२ शहरांची निवड करण्यात आली. औरंगाबाद विभागातील १७ शहरांचा त्यात समावेश आहे. यात आठही जिल्ह्यांची ठिकाणे समाविष्ट असून औरंगाबाद म्हाडा विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या एकूण प्रकल्प अहवालांपैकी प्रस्ताव राज्य केंद्रीय समितीतर्फे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती डॉ. रामोड यांनी प्रास्ताविकात दिली.
 
अडीच लाखांचे अनुदान मिळणार
एकूणदोन हेक्टर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या या योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी २४०, तर मध्यम उत्पन्न गटासाठी ८० फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. ४१३.७२ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असणाऱ्या एका फ्लॅटची अंदाजित किंमत लाख ५० हजार इतकी अाहे. प्रत्येक फ्लॅटला केंद्र शासनाचे लाख ५० हजार, तर राज्य शासनाचे लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...