आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mi Aurangabadkar Movement Gaining Huge Response From Citizen

मोहिम 'मी औरंगाबादकर'- फक्त रस्‍ते नकोत, चांगले रस्‍ते हवेत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चांगले रस्ते आणि कचर्‍यासाठी सुरू असलेल्या ‘मी औरंगाबादकर’ या जनआंदोलनाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई, माजी प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही शहरवासीयांना विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. कँटोनमेंट रोटरी क्लब, देवगिरी, एमआयटी, एमजीएम महाविद्यालयातील प्राध्यापक, उद्योजक, व्यावसायिक, महिला आणि युवक सह्यांच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मोठय़ा संख्येने जागरूक नागरिक www.miaurangabadkar.in या वेबसाइटवर भेट देऊन महापौर आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहीत आहेत.

शहरवासीयांच्या दबावानंतर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झाले खरे, मात्र अजूनही सदोष काम होत असल्याचे दिसते. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी स्थिती आहे. याशिवाय शहरात कचर्‍याचा गंभीर प्रश्न कायम आहे. त्यामुळे तात्पुरता विरोध करून उपयोग होणार नाही. त्यासाठी लोकांचा कायम दबाव असणे गरजेचे असल्याचे ‘मी औरंगाबादकर ग्रुप’ने स्पष्ट केले आहे.

वेबसाइटला प्राधान्य द्या..

आपल्या या मोहिमत ‘मी औरंगाबादकर’ने छापील पत्र तयार केले आहे. दुसरी बाब म्हणजे www.miaurangabadkar.in ही वेबसाइटही तयार केली आहे. छापील पत्रांच्या प्रती मात्र आता संपत आल्या आहेत. त्यामुळे वेबसाइटवर जाऊन पत्र लिहिण्याचे आवाहन या ग्रुपने केले आहे. तिसरा पर्याय म्हणजे ग्रुपने फेसबुकवर ‘मी औरंगाबादकर’

(https://www.facebook.com/groups/press.rupesh/) ग्रुप जॉइन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


माझे शहर सुंदर हवे
या शहरातला आहे. हे शहर सुंदर राहावे, असे मलाही वाटते. त्यासाठी मी योगदान दिले पाहिजे. म्हणून मी या अभियानात सहभागी झालो. बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्यासाठी सगळ्यांनी एक धक्का लावलाच पाहिजे.
मंगेश देसाई, अभिनेता

मोहिमेत सहभागी व्हा
आपल्या शहरात स्वच्छ आणि हरित शहर हे दृश्य फक्त पोस्टरबाजीपुरते दिसते. कचरा, रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. अशा वेळी ‘मला काय त्याचे’ म्हणून चालणार नाही. आवश्यक तेव्हा, आवश्यक तिथे दबावगट असला पाहिजे. त्यामुळे मी औरंगाबादकर मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन शहर विकासासाठी आपला वाटा उचलला पाहिजे.
रा. रं. बोराडे, माजी प्राचार्य