आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Education At Sarswati Bhavan At Aurangabad

बातमी आनंदाची: सरस्वती भुवनमध्ये मायक्रोसॉफ्टचे शिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षण मिळावे, तेही नाममात्र शुल्क आकारून. तसेच व्यवसाय व नोकरीसाठी या शिक्षणाचा फायदा व्हावा या हेतूने सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेने मायक्रोसॉफ्ट संगणक कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स कॉर्मस शाखेच्या मुलांसाठी आहे. मुलांची रोजगाराची क्षमता वाढावी आणि त्यांचे भविष्य घडावे हाच यामागचा उद्देश असून असे शिक्षण देणारे सरस्वती भुवन हे महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय ठरले असल्याचा दावाही येथील शिक्षकांनी केला आहे.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणात आयटी हा विषय असतो. त्यांना प्रत्यक्ष सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम असतो. तो शिकवण्यासाठी सॉफ्टवेअर तज्ज्ञ येतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून मुलाना अभ्यासाव्यतिरिक्त प्रत्यक्ष फिल्डमध्ये येणारे अनुभवही समजतात. याचा फायदा मुलांना परीक्षेत होतो. तसेच व्यवसायाच्या दृष्टीनेही हा अनुभव फायदेशीर ठरतो. हाच उपक्रम आपल्या महाविद्यालयातही राबवावा, असा विचार महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी केला आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली.

दिल्लीत जाऊन घेतली माहिती : सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. खैरनार व अन्य प्राध्यापकांनी दिल्लीतील ए.पी.एस. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संचालकांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. त्यांना कॉर्मसच्या विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट कोर्सचा कसा फायदा होईल हे पटवून दिले. त्यानंतर त्यांनी यासाठी होकार दिला. मुलांना मायक्रोसॉफ्टचे कोर्स शिकवण्यासाठी दोन प्राध्यापकांची स्वतंत्र नेमणूक केली. मायक्रोसॉफ्टने हा कोर्स शिकवण्यासाठी दोन तज्ज्ञांना पाठवले. बंगळुरू आणि ओडिशा येथील शिक्षक सुतीर्थ सन्यान आणि अमृत राज अशी या शिक्षकांची नावे आहेत.

असे दिले जाते शिक्षण : दर आडवड्याला थेअरीचे दोन क्लास, तर पॅ्रक्टिकलचे दोन क्लास होतात. या कोर्सचे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सर्व शिक्षण संगणकाद्वारे दिले जाते. प्रत्येक क्लासरूममध्ये एलसीडी प्रोजेक्टर लावलेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ‘डायस’ व स्पीकरही बसवण्यात आले आहेत. याची किंमत 40 हजार रुपये आहे. या महाविद्यालयातील एक मजला पूर्णपणे वायफाय कनेक्शनची सोय असलेला आहे.

फीस मात्र मुबलक : हा कोर्स शिकण्यासाठी बाहेर जास्त खर्च येतो; पण महाविद्यालयाने मात्र प्रत्येक विद्यार्थ्याकडून केवळ 300 रुपये फीस घेऊन शिक्षण देण्याची सोय केली आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रत्येक मुलाला 5 मायक्र ोसॉफ्ट सर्टिफिकेट्स दिली जाणार आहेत. यासाठी दर सहा महिन्यांनी परीक्षा घेतली जाते.