आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यदिनानंतर मध्यान्ह भोजन शिजवण्यावर बहिष्कार, मुख्याध्यापकांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील सात हजार शाळांमध्ये 16 ऑगस्टपासून पोषण आहार शिजवण्यावर मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोषण आहारासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा नेमावी, शिक्षक व मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपवण्यात येऊ नये, अशी शिक्षक संघाची मागणी आहे.

शासनाने सर्वोच्च न्यायालयीन आदेशानुसार मुख्याध्यापकांवर पोषण आहाराची जबाबदारी टाकली आहे. आहारात काही गैर घडल्यास त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर येते. शासनाने या जाचातून शिक्षकांना मुक्त करावे या मागणीसाठी बहिष्कार टाकण्यात येणार आहे. शिक्षण सचिव सहारिया यांनी पोषण आहार बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष युनूस पटेल, एम. पी. सुरगडे, के. डी. महाजन, मोहन सोनवणे, पी. एम. पवार, गोविंद मुंड आदी सहभागी होते.

शिक्षक अडचणीत

शासनाकडून एकीकडे शिक्षक मुख्याध्यापकांना अध्यापनाच्या कामाशिवाय कोणते काम लावू नये, असा नियम असताना दुसरीकडे शाळेत शालेय पोषण आहार शिजवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच खिचडीत केस, अळी अथवा इतर काही आढळून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी झाल्यास थेट शिक्षक व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात येतो.