आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तांतरण शुल्कात 10% वाढ,वाळूज नगर 3 परिसर नागरीकरणास अयोग्य क्षेत्र घोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भूसंपादनास नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता सिडकोने वाळूज महानगरातील नगर 3 नागरीकरणात मोडत नसल्याचा निर्णय मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महानगर 3 मधील जमिनीवर नागरीकरण करणे अयोग्य असल्याने सिडकोने 6939.15 हेक्टर क्षेत्र नागरीकरणातून वगळले. यामुळे वाळूज महानगरातील मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्काचा दहा टक्के अतिरिक्त भार पडणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या औरंगाबाद दौ-यानंतर नवीन सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी भूसंपादनासाठी अडचणीचे ठरणारे प्रकल्प वगळण्यासंबंधी विधान केले होते. हा परिसर एमआयडीसीला विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे. या मोबदल्यात एमआयडीसी औरंगाबाद नगर रस्त्यावरील वाळूजपासून ते शिर्डी रस्त्याला बजाज कंपनीच्या पश्चिमेकडून जोडणारा वळण रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये येणा-या जड वाहनांसाठी फायदा होईल. यातून औरंगाबाद नगर रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होईल.

आठशे हेक्टरवर महानगर : औरंगाबादहून लासूर स्टेशनमार्गे शिर्डीला जाणा-या रस्त्यावरील हलक्या जमिनीवर महानगर 5 व 6 वसविण्याचा सिडकोने निर्णय घेतला आहे. दोन्हीमध्ये सुमारे आठशे हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे. वाळूज महानगरालगत असल्याने येथे महानगर उभारण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.