आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

68 कोटींचा कर, तरी गैरसोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्थानिक संस्था कर आणि मालमत्ता कराच्या माध्यमातून चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजक दरवर्षी 65 कोटींचा कर भरतात. मात्र, येथे कुठलीही सुविधा पुरवली जात नाही. पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने उद्योग सुरू करण्यास कोणीही धजावत नाहीत. त्यामुळे येथे किमान सुविधा तरी मिळाव्यात, अशी अपेक्षा उद्योजक व्यक्त करत आहेत.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथील विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे मनपाने चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी उद्योजक करत आहेत. पायाभूत सुविधांसाठी सहकार्य करण्याची तयारीही उद्योजकांनी दर्शवली. पर्यटन वृद्धीसाठी जुन्या वास्तूंच्या जतनाची जबाबदारी तसेच खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेण्याची उद्योजकांची तयारी आहे.

* अनेक कंपन्यांचे सीईओ शहरात आल्यानंतर त्यांना शहरातील सुविधा दाखवाव्याशा वाटत नाहीत. मनपाने ड्रेनेजची सुविधा उपलब्ध करावी. विकासासाठी पुरातन वास्तूंचे जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी सीआयआय पुढाकार घेईल. खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठीदेखील उद्योजक तयार आहेत. ऋषी बागला, विभागीय अध्यक्ष, सीआयआय.

अपघाताची शक्यता
चिकलठाणा एमआयडीसी 65 कोटींचा कर भरते. मात्र, येथे रस्त्याची दुरवस्था आहे. ग्रीव्हज कॉटन रोडवरून गॅसचे दररोज किमान 100 टँकर जातात. खड्डय़ांमुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, मनपाकडून दुर्लक्ष होते. एमआयडीसीतील 80 टक्के पथदिवे बंद आहेत. अर्जुन गायके, उद्योजक.

वाहतुकीचीही सोय नाही
शहरात स्वच्छतेची मोठी समस्या आहे. बीड बायपास रोड, पैठण रोडवर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. सिग्नल नसल्याने अनेकदा अपघात होतात. त्यामुळे चांगल्या सुविधा दिल्यास उद्योगासोबत शहराचाही विकास होईल. मिलिंद कंक, अध्यक्ष, सीएमआय.