आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन बड्या कंपन्या 500 कोटींच्या सुट्या भागांची खरेदी करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा, वाळूज येथील तीन बड्या कंपन्या स्थानिक छोट्या उद्योजकांकडून 500 कोटींच्या सुट्या भागांची खरेदी करण्यास तयार झाल्या आहेत. चार जुलैला सीआयआयतर्फे होणार्‍या खरेदी-विक्रीदारांच्या परिषदेत या व्यवहाराचे पहिले पाऊल टाकले जाणार आहे. वर्षभरात एनआरबी, अँड्रेस अँड हाऊजर, ग्रीव्हज कॉटन आणि उद्योजकांमधील करार होतील.

औरंगाबादच्या अनेक कंपन्या पुणे, मुंबई, हैदराबाद येथून सुटे भाग मागवतात. दुसरीकडे काही छोटे उद्योजक सुटे भाग पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्लीला पाठवतात. सीआयआयचे विभागीय अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी स्थानिक उद्योजकांकडूनच सुट्या भागांची खरेदी होऊ शकते का, याची चाचपणी केली. तेव्हा त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चार जुलैला हॉटेल रामा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. या वेळी एनआरबीचे उपाध्यक्ष हेमंत जोग, अँड्रेस हाऊजरचे अध्यक्ष, संचालक एन. श्रीराम, ग्रीव्हज कॉटनचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर अनिलसिंग मखलोगा यांची उपस्थिती होती.
22 उद्योजकांकडून नोंदणी
एनआरबी, ग्रीव्हज कॉटन सध्या प्रत्येकी 100 कोटींचे तर अँड्रेस हाऊजर 60 कोटींचे सुटे भाग औरंगाबाद बाहेरून मागवते. स्थानिक उद्योजकांनी तयारी दाखवली तर तिन्ही कंपन्या 500 कोटींचे सुटे भाग खरेदी करतील, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 22 स्थानिक उद्योजकांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली आहे. इच्छुकांनी अमोल मोहिते 9823297847, संदीप नागोरी 9422204550 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.