आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एमआयडीसी'मुळे सॉफ्टवेअर उद्योजकांच्या नशिबी 'हार्ड'स्ट्रगल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा येथील सॉफ्टवेअर टेक्नाॅलॉजी पार्कमधील उद्योजकांना एमआयडीसीने गाळ्यांचे भाडे वाढवून अडचणीत आणले आहे. अचानक सातपटींनी भाडे वाढवल्याने काहींनी तेथून उद्योगच दुसरीकडे हलवण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयडीसीच्या भ्रष्ट कारभाराचा पाढाच उद्योजकांनी आज वाचून दाखवल्याने हा प्रकार उघड झाला आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची तक्रार या उद्योजकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह थेट पंतप्रधानापर्यंत केली आहे.

माजी केंद्रीय दूरसंचार व तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते १ मे २००१ रोजी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचे उद्घाटन होऊन शहरात सॉफ्टवेअर उद्योगाला सुरुवात झाली. तेव्हा ई.सी.टीव्हीची इमारत या पार्कला भाड्याने दिली तेव्हा ७ रुपये चौरस फूट असे भाडे ठरले. पण येथे वीज व पाण्याची पुरेशी सुविधा नाही. शिवाय ब्रॉडबँडची स्पीडही बरीच वर्षे नीट मिळत नव्हती. त्यामुळे बरेच उद्योजक कंटाळून पुणे किंवा इतरत्र निघून गेले. तरीही काही उद्योजक टिकून राहिले. २०१० च्या सुमारास तत्कालीन उद्योग मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या पार्कचा लूक बदलण्याचा निर्णय घेतला. २०१४ च्या शेवटी उद्योजकांना विश्वासात न घेता नूतनीकरणाचे काम घेण्यात आले. इमारतीचे इंटेरिअर जुनेच पण बाहेरून फाइव्ह स्टार हॉटेलसारखा लूक देऊन गाळ्यांचे भाडे ७ रुपये चौ.फुटांवरून ४५ रुपये चौ.फूट करण्यात आले.

थेट मोदींना पत्र
उद्योजकांनी भाडेवाढीच्या विरोधात सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. पण कुणीच दखल घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी उद्योजकांना तुम्ही अवैध पद्धतीने गाळे घेतले आहेत, असा आरोप केल्याने उद्योजक संतापले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह थेट पंतप्रधान मोदींकडेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची तक्रार केली आहे.

आमचा प्रडंच छळ सुरू
एमआयडीसीने आमचा इतकी वर्षे छळ केला. सुविधाही दिल्या नाहीत. आता प्रचंड मोठी भाडेवाढ केल्याने आम्हाला येथून काढण्याचा या अधिकाऱ्यांचा डाव आहे.
प्रताप धोपटे, एक्सलाइज सॉफ्टवेअर,प्रा.लि.

सापत्न वागणूक
एमआयडीसीचे अधिकारी आम्हाला सापत्नपणाची वागणूक देत आहेत. आम्हाला विचारात न घेता त्यांनी नूतनीकरण केले. आता त्यांचा आम्हाला येथून बाहेर काढण्याचा डाव आहे.
संदीप पाठक, इंडियन इंटरनेट सोल्युशन

बाहेरूनच सुंदर
ही इमारत दुरून खूप छान दिसते. पण आतील इलेक्ट्रिफिकेशनसह इमारतीचे नूतनीकरण करणे गरजचे होते. इमारत बाहेरून सुंदर असली तरी आतून पोखरलेली आहे.
- स्वप्निल महाजन, एनरीच वेब टेक्नॉलॉजी

अनेक उद्योजक गेले
या पार्कमध्ये वीज, पाणी आणि पायाभूत सुविधा नाहीत. ती जबाबदारी एमआयडीसीची असतानाही त्यांनी दिल्या नाहीत. त्यामुळे अनेक उद्योजकांनी तेथून व्यवसायच हलवला.
केदार पानसे, बँक ब्रीज कंपनी

विश्वासात घेतले नाही
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचा चेहरामोहरा फक्त बाहेरून बदलला. आतूनही बदलायला हवा होता.त्यामुळे एमआयडीसीने केलेली भाडेवाढ मान्य नाही.
पुनित धिंग्रा, लॉयल इन्फोसर्व्हिस प्रा.लि.

आमचा सतत अपमान
एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात आम्ही बेकायदेशर पद्धतीने हे गाळे वापरतो, ही भाषा अत्यंत चुकीची व बेजबाबदारपणाची आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे तक्रार केली.
अभिजित मोदी,आयएआरई प्रा.लि.

उद्योजकांचे आरोप चुकीचे
उद्योजकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे नूतनीकरणाचा निर्णय झाला. आता तेच बाजू पलटून बोलत आहेत. भाडेवाढ योग्य आहे.वर्षाला दहा टक्के हिशेबानेही ती जास्त होते.४६ रुपये हा दर योग्य आहे. उद्योजकांना त्रास देण्याची भावना नाही.
अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी