आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milind College First Graduate Woman Students View

बाबासाहेबांच्या आठवणींचा दीप प्रज्वलितच ठेवायचाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘‘देशाचे संविधान लिहिणारे युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फिलॉसॉफी म्हणजेच तत्त्वज्ञानाचा वर्ग घेतला होता. याचा मला सार्थ अभिमान आहे. 58 वर्षांनंतरही या सुवर्णक्षण अनुभूतीचा दीप मला कायम प्रज्वलित ठेवायचा आहे..!’’ हे वाक्य आहे, बाबासाहेबांनी स्थापलेल्या मिलिंद महाविद्यालयातील पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी लीला पांडे-सहारिया यांचे. 1951 ते 1955 या चार वर्षांत त्यांनी ‘मिलिंद’मधून बी.ए. केले. त्या वेळी बाबासाहेबांनी 1955 मध्ये वर्ग घेतला.

काही कामानिमित्त लीलाताई शहरात आल्या असता ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची सोय करून देण्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांची औरंगाबादेत स्थापना केली. नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी छावणीतील बंगला क्रमांक 3, 5, 6 आणि 7 मध्ये ‘मिलिंद’ होते. गुलमंडीतील सुपारी हनुमान मंदिराशेजारी भरणार्‍या तत्कालीन शारदा मंदिर शाळेतून दहावीच्या शिक्षणानंतर आपण 1951 मध्ये छावणी कॅन्टोनमेंटच्या मिलिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. बी.ए.साठी सिव्हिक, मराठी, इंग्रजी आणि फिलॉसॉफी (दर्शनशास्त्र) असे साधारणत: विषय असल्याचे त्यांनी आठवून सांगितले. दोनशे मुलांच्या घोळक्यात फक्त दहा मुलींनी उच्चशिक्षण घेण्याची हिंमत त्या वेळी दाखवल्याचे पांडे यांनी सांगितले. वर्गात तर केवळ चार मुली होत्या.