आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Milind College Student Strike Issue At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलिंद महाविद्यालयय बंदला संमिश्र प्रतिसाद, विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्याचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांवरगुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या वतीने मिलिंद कला महाविद्यालययात बंद पुकारण्यात आला होता. बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला तर महाविद्यालययाचे काम सुरळीत पार पडल्याचे मिलिंद कला महाविद्यालययाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले.

नागसेनवन येथील मिलिंद कला वाणिज्य महाविद्यालययात २२ ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी प्राचार्यांचे विद्यार्थ्यांसाठी भाषण आयोजित करण्यात आले होते. भाषणानंतर समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मत व्यक्त करण्यास सांगण्यात आले. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले त्यांच्याच विरोधात प्राचार्यांनी पोलिसात तक्रार दिली. यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुवारी बंद पाळला.दरम्यान, परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेचे काम सुरू असून महाविद्यालयय बंद नव्हते. कार्यक्रम सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी स्टेजवर येऊन गोंधळ घातला होता शिस्तीचा भाग म्हणून त्यांची तक्रार करण्यात आली होती. असे प्राचार्या डॉ.प्रधान यांनी सांगितले.

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता, तर छावणी पोलिस ठाण्याचे पोेलिस निरीक्षक गौतम फसले, प्रकाश दांडगे यांनी चार विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.