औरंगाबाद- एमआयटी आणि मॅरेथॉन धावपटूंची संघटना औरंगाबाद ब्लॅक बक यांच्यातर्फे २६ नोव्हेंबरला आयोजित अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले तसेच सहभागी होऊ इच्छिणारांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रख्यात अभिनेता, सुपरमॉडेल, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावणारा मिलिंद सोमण गुरुवारी शहरात येत आहे. एमआयटी महाविद्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद ब्लॅक बकतर्फे आयोजित मॅरेथॉन २६ नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ते मार्गदर्शन करणार आहेत.